Mumbai Hit-and-Run : विरुद्ध दिशेने भरधाव येणाऱ्या दुचाकीने ९ वर्षीय मुलीला उडवले; चालक फरार, CCTV मध्ये घटना कैद

मुंबईतील अंधेरी येथे विरुद्ध दिशेने भरधाव येणाऱ्या दुचाकीने ९ वर्षीय मुलीला धडक दिली. अपघातानंतर चालक फरार झाला असून संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
Mumbai Hit-and-Run : विरुद्ध दिशेने भरधाव येणाऱ्या दुचाकीने ९ वर्षीय मुलीला उडवले; चालक फरार, CCTV मध्ये घटना कैद
Mumbai Hit-and-Run : विरुद्ध दिशेने भरधाव येणाऱ्या दुचाकीने ९ वर्षीय मुलीला उडवले; चालक फरार, CCTV मध्ये घटना कैदX
Published on

मुंबई : अंधेरी परिसरात चुकीच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीस्वाराने ९ वर्षीय मुलीला जोरदार धडक दिल्याची घटना बुधवारी (दि. १५) घडली. या अपघातात मुलगी जखमी झाली असून, अपघातानंतर चालक घटनास्थळावरून फरार झाला. ही संपूर्ण घटना CCTV मध्ये कैद झाली असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अंबोली पोलिसांनी अज्ञात दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.

चुकीच्या दिशेने येणाऱ्या दुचाकीची धडक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी मुलीचे नाव रेवा पवार (वय ९) असे आहे. अंबोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. संबंधित दुचाकीस्वार चुकीच्या दिशेने आणि भरधाव वेगाने वाहन चालवत होता. याचदरम्यान त्याने रेवा हिला जोरदार धडक दिली.

मुलीवर रुग्णालयात उपचार

अपघातानंतर स्थानिकांच्या मदतीने जखमी मुलीला तातडीने कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, तिची प्रकृती सध्या स्थिर असून ती धोक्याबाहेर आहे.

आरोपीचा शोध सुरू

अंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल पाटील यांनी सांगितले की, अज्ञात दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू असून, त्याच्या आधारे आरोपीची ओळख पटवून त्याला लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.

दरम्यान, या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, विरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in