Mumbai : अपघात रोखण्यासाठी पायाभूत सुविधा उभारा! हायकोर्टाचे रेल्वे, राज्य सरकारला निर्देश

मुंबईच्या उपनगरीय रेल्वे रुळांवरील प्रवाशांचे मृत्यू आणि जखमी होण्याच्या सुरू असलेल्या घटनांबाबत चिंता व्यक्त करत मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी रेल्वे आणि राज्य प्रशासनाला गर्दी कमी करण्यासाठी आवश्यक पायाभूत उपाययोजना स्पष्ट करण्याचे निर्देश दिले.
Mumbai : अपघात रोखण्यासाठी पायाभूत सुविधा उभारा!  हायकोर्टाचे रेल्वे, राज्य सरकारला निर्देश
Published on: 

मुंबई : मुंबईच्या उपनगरीय रेल्वे रुळांवरील प्रवाशांचे मृत्यू आणि जखमी होण्याच्या सुरू असलेल्या घटनांबाबत चिंता व्यक्त करत मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी रेल्वे आणि राज्य प्रशासनाला गर्दी कमी करण्यासाठी आवश्यक पायाभूत उपाययोजना स्पष्ट करण्याचे निर्देश दिले. विशेषतः ठाणे-कल्याण पट्ट्यातील गर्दी कमी करण्यासाठी काय उपाययोजना आवश्यक आहेत, हे स्पष्ट करण्यास सांगितले आहे.

Mumbai : अपघात रोखण्यासाठी पायाभूत सुविधा उभारा!  हायकोर्टाचे रेल्वे, राज्य सरकारला निर्देश
वेळ हीच मुख्य अट मानून करार रद्द करता येत नाही; ४२ वर्षांच्या लढ्यात मूळ भाडेकरूच्या वारसदारांना दिलासा

गर्दीच्या लोकलमधून पडून किंवा रेल्वे रुळ ओलांडताना होणाऱ्या प्रवाशांच्या मृत्यूसंदर्भातील पूर्वीच्या प्रकरणात उच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्याची मागणी करणाऱ्या सरोश मेहता यांच्या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती एम. सी. त्रिपाठी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू होती.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)