Mumbai : वीकेंडला ट्रेनने प्रवास करताय? आधीच जाणून घ्या वेळापत्रक; उद्या 'या' मार्गावर २१ तासांचा मेगाब्लॉक

प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करताना वेळापत्रक तपासूनच निघावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. ब्रिज क्रमांक ६१च्या री-गर्डरिंग (पुलाच्या दुरुस्ती) कामासाठी हा ब्लॉक घेण्यात येत आहे.
Mumbai : वीकेंडला ट्रेनने प्रवास करताय? आधीच जाणून घ्या वेळापत्रक; उद्या 'या' मार्गावर २१ तासांचा मेगाब्लॉक
Mumbai : वीकेंडला ट्रेनने प्रवास करताय? आधीच जाणून घ्या वेळापत्रक; उद्या 'या' मार्गावर २१ तासांचा मेगाब्लॉक
Published on

कांदिवली ते बोरीवली स्थानकादरम्यान पश्चिम रेल्वेकडून जंबो ब्लॉक घेण्यात येणार असून, याचा परिणाम उपनगरीय लोकल सेवांवर होणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करताना वेळापत्रक तपासूनच निघावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. ब्रिज क्रमांक ६१च्या री-गर्डरिंग (पुलाच्या दुरुस्ती) कामासाठी हा ब्लॉक घेण्यात येत आहे.

ब्लॉकची वेळ

  • २८ मार्च रात्री २२:३० ते २९ मार्च सायं. १९:३०
    अप आणि डाऊन स्लो लाईनवर जंबो ब्लॉक

  • २९ मार्च पहाटे ०१:०० ते ०४:३०
    डाऊन फास्ट लाईनवर अतिरिक्त ब्लॉक

या कालावधीत स्लो लाईनवरील सर्व गाड्या गोरेगाव-बोरीवली दरम्यान फास्ट लाईनवर वळवण्यात येतील, तर डाऊन फास्ट लाईन ब्लॉकदरम्यान राम मंदिर, मालाड आणि कांदिवली स्थानकांवर गाड्या थांबणार नाहीत.

लोकल सेवांमध्ये काय बदल?

अंधेरी-बोरीवलीदरम्यान गाड्या ५व्या लाईनवर चालवल्या जातील आणि बोरीवली स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक १ व २वर गाड्या थांबणार नाहीत. काही गाड्या अंधेरी व गोरेगाव येथे शॉर्ट-टर्मिनेट किंवा रद्द करण्यात येतील, तर सर्व १५ डब्यांच्या स्लो गाड्या अंधेरी-बोरीवलीदरम्यान फास्ट म्हणून धावतील.

सेंट्रल आणि ट्रान्स हार्बर लाईनवरही ब्लॉक

सेंट्रल लाईन

  • माटुंगा-मुलुंड (अप-डाऊन स्लो लाईन)

  • वेळ: ११:०५ ते १५:५५

  • स्लो गाड्या फास्ट लाईनवर वळवल्याने २० मिनिटांपर्यंत उशीर होण्याची शक्यता आहे.

ट्रान्स हार्बर लाईन

  • ठाणे-वाशी/नेरुळ (ठाणे-पनवेल मार्गासह)

  • वेळ: ११:१० ते १६:१०

  • या मार्गावरील सर्व सेवा पूर्णपणे बंद असणार आहेत.

मात्र, खारकोपर ते उरण आणि CSMT ते वाशी/पनवेल या सेवा नियमित सुरू राहतील. त्यामुळे प्रवाशांनी प्रवासापूर्वी वेळापत्रक तपासून पर्यायी व्यवस्था ठेवावी, असे रेल्वे प्रशासनाने आवाहन केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in