Mumbai : मालाड रेल्वे स्थानकात नमाज पठणाचा व्हिडिओ व्हायरल; किरीट सोमय्या आक्रमक, तिघा फेरीवाल्यांवर गुन्हा दाखल

मुंबईतील मालाड रेल्वे स्थानकावर नमाज पठणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तिघा फेरीवाल्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. भाजप नेते किरीट सोमय्या यांनीही या प्रकरणी कारवाईची मागणी केली आहे.
Mumbai : मालाड रेल्वे स्थानकात नमाज पठणाचा व्हिडिओ व्हायरल; किरीट सोमय्या आक्रमक, तिघा फेरीवाल्यांवर गुन्हा दाखल
Published on

मुंबईतील मालाड रेल्वे स्थानक येथे प्लॅटफॉर्मवर नमाज अदा केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तीन फेरीवाल्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी रेल्वे सुरक्षा दल (RPF) आणि रेल्वे पोलीस (GRP) यांनी स्वतंत्र कारवाई केली आहे.

IANSच्या वृत्तानुसार, मालाड रेल्वे स्थानकावर काही फेरीवाले नमाज अदा करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या प्रकरणी RPFने रेल्वे कायद्याच्या कलम १४७ अंतर्गत अतिक्रमणाचा गुन्हा नोंदवला आहे. तसेच स्थानक प्रमुखांनी दिलेल्या तक्रारीवरून GRPने भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १६८ अंतर्गत आणखी एक गुन्हा दाखल केला आहे.

व्हायरल व्हिडिओ पाहा

दरम्यान, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजप नेते किरिट सोमय्या यांनी तातडीने कारवाईची मागणी केली होती. त्यांनी यासंदर्भात रेल्वे अधिकाऱ्यांना पत्रही पाठवले असून ते पत्र त्यांनी आपल्या X खात्यावर शेअर केले आहे. या पत्रात मालाड रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर काही मुस्लिम व्यक्ती नमाज अदा करत असल्याचा व्हिडिओ प्रवाशांनी पाठवल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच हा प्रकार गंभीर असून रेल्वे प्रशासनाने याची दखल घेऊन तातडीने कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

या सर्व घडामोडीनंतर रेल्वे प्रशासनाने प्रकरणाची दखल घेत संबंधित तीन फेरीवाल्यांविरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in