Mumbai : चर्चगेट मेट्रो स्थानकाचे A4 गेट तात्पुरते बंद; कधी होणार सुरू? जाणून घ्या वेळ

काही दिवसांपूर्वी मेट्रो ३ प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी जगन्नाथ शंकर शेट (मुंबई सेंट्रल), आचार्य अत्रे चौक आणि वरळी स्थानकांवर नवीन प्रवेश व निर्गम गेट्स सुरू केले आहेत.
Mumbai : चर्चगेट मेट्रो स्थानकाचे A4 गेट तात्पुरते बंद; कधी होणार सुरू? जाणून घ्या वेळ
Mumbai : चर्चगेट मेट्रो स्थानकाचे A4 गेट तात्पुरते बंद; कधी होणार सुरू? जाणून घ्या वेळ (Photo-@MMRC)
Published on

मुंबई मेट्रो ३ (अक्वा लाईन) प्रशासनाने चर्चगेट मेट्रो स्थानकावरील एका प्रवेशद्वाराबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी आणि सुरक्षेच्या दृष्टीने काही कामांमुळे हे गेट तात्पुरते बंद ठेवण्यात येणार आहे.

A4 गेट तात्पुरते बंद

अधिकृत माहितीनुसार, चर्चगेट मेट्रो स्थानकावरील मरीन प्लाझा परिसरातील A4 प्रवेश/निर्गम (Entry/Exit) गेट (पायऱ्या) ४ एप्रिलपासून ५ एप्रिल रात्रीपर्यंत बंद राहणार आहे.

पुन्हा सुरू होण्याची वेळ

हे गेट ६ एप्रिल रोजी सकाळी ५:५५ वाजता पुन्हा प्रवाशांसाठी खुले करण्यात येणार आहे. दरम्यान, प्रवाशांनी इतर उपलब्ध प्रवेशद्वारांचा वापर करावा, असे आवाहन मेट्रो प्रशासनाने केले आहे.

नवीन गेट्समुळे प्रवास सुलभ

दरम्यान, काही दिवसांपूर्वी मेट्रो ३ प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी जगन्नाथ शंकर शेट (मुंबई सेंट्रल), आचार्य अत्रे चौक आणि वरळी स्थानकांवर नवीन प्रवेश व निर्गम गेट्स सुरू केले आहेत.

महत्त्वाच्या ठिकाणांशी कनेक्टिव्हिटी वाढली

जगन्नाथ शंकर शेट स्थानकावरील B4 गेटमुळे मराठा मंदिर परिसरात पोहोचणे सोपे झाले आहे. आचार्य अत्रे चौक येथील A1 आणि A2 गेट्समुळे MCGM इंजिनिअरिंग हबपर्यंत थेट प्रवेश मिळतो. तर वरळी स्थानकावरील A2 गेटमुळे कमला मिल्स परिसरात सहज जाता येते.

अक्वा लाईनला प्रवाशांची पसंती

मुंबईतील पहिली पूर्णतः भूमिगत मेट्रो असलेली अक्वा लाईन शहरातील उत्तर-दक्षिण कनेक्टिव्हिटी सुधारण्यात महत्त्वाची ठरत आहे. त्यामुळे प्रवाशांकडून या सेवेला वाढती पसंती मिळत आहे.

मोबाईल नेटवर्कचा प्रश्न कायम

मात्र, भूमिगत मार्गावर मोबाईल नेटवर्क नसणे ही अजूनही मोठी समस्या आहे. यापूर्वी आरे JVLR ते आचार्य अत्रे चौक दरम्यान Vodafone सेवा उपलब्ध होती, मात्र ती सध्या बंद झाल्याने विशेषतः आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in