२०२६ ची 'टाटा मुंबई मॅरेथॉन' येत्या रविवारी, १८ जानेवारीला होणार असून, या मॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या हजारो धावपटूंना वेळेत पोहोचता यावे, यासाठी मुंबई मेट्रो ३ (Aqua Line) कडून विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. मॅरेथॉनच्या दिवशी Aqua Line वर पहाटेपासून अतिरिक्त व लवकर सुरू होणाऱ्या मेट्रो सेवा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती मेट्रो प्रशासनाने दिली आहे.
मुंबई मेट्रो ३ (Aqua Line) चे विशेष वेळापत्रक
टाटा मॅरेथॉन दरम्यान धावपटू प्रवाशांच्या सोयीसाठी पुढीलप्रमाणे अतिरिक्त गाड्या सोडण्यात येतील.
सकाळी ३:३० वाजता - आरे जेव्हीएलआर व कफ परेड येथून (दोन्ही टर्मिनल्सवरून पहिली ट्रेन)
सकाळी ४:३० वाजता - आरे जेव्हीएलआर येथून दुसरी ट्रेन
सकाळी ४:५० वाजता - कफ परेड येथून दुसरी ट्रेन
मेट्रो ३ च्या अधिकृत X वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "मॅरेथॉनसाठी लवकर निघताय? ॲक्वा लाईनसोबत तुमचा प्रवास करा अधिक जलद व सोयीस्कर. टाटा मुंबई मॅरेथॉनच्या निमित्ताने १८ जानेवारी रोजी अतिरिक्त मेट्रो सेवा प्रवाशांसाठी उपलब्ध असतील. सुरक्षित, सोयीस्कर आणि वेळेत प्रवास करा.
मॅरेथॉन कधी सुरू होणार?
मॅरेथॉनची सुरुवात : पहाटे ५.०० वाजता
सुरुवातीचे ठिकाण : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT)
अंतर : ४२.१९५ किमी
समाप्तीचे ठिकाण : एमजी रोड येथील मुंबई जिमखाना
शेकडो धावपटूंची पहाटे प्रवासाची गैरसोय होऊ नये, तसेच मॅरेथॉनसाठी वेळेत पोहोचता यावे, यासाठी मेट्रोने ही विशेष सोय करण्यात आली आहे.