Monsoon Tourism : पावसाळ्यात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला भेट देणार आहात? मग ही माहिती नक्की वाचा

पावसाळ्यात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला जाण्याचा प्लॅन आहे? प्रवेश वेळ, तिकीट, कान्हेरी लेणी, लायन-टायगर सफारी, ट्रेकिंग आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या.
Monsoon Tourism : पावसाळ्यात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला भेट देणार आहात? मग ही माहिती नक्की वाचा
Monsoon Tourism : पावसाळ्यात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला भेट देणार आहात? मग ही माहिती नक्की वाचा
Published on

मुंबईत पावसाळा सुरू झाला की शहराला हिरवाईची नवी झळाळी मिळते. या दिवसांत निसर्गाचा मनमुराद आनंद घ्यायचा असेल, तर बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान (SGNP) हा उत्तम पर्याय ठरतो. पावसामुळे हिरवाईने नटलेले जंगल, धुक्यात हरवलेले रस्ते, वाहणारे धबधबे आणि वन्यजीवांचे दर्शन अशा अनेक गोष्टींचा अनुभव येथे घेता येतो. ट्रेकिंग, सफारी किंवा ऐतिहासिक कन्हेरी लेण्यांना भेट देण्याचा विचार करत असाल, तर जाण्यापूर्वी ही माहिती नक्की जाणून घ्या.

मुंबईच्या मध्यभागातील हिरवागार श्वास

सुमारे १०३ चौरस किलोमीटर परिसरात पसरलेले संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे जगातील मोजक्या महानगरांमधील राष्ट्रीय उद्यानांपैकी एक आहे. मुंबईचे ‘ग्रीन लंग’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या उद्यानात ४० हून अधिक सस्तन प्राणी, २५० पेक्षा जास्त पक्ष्यांच्या प्रजाती, शेकडो प्रकारची फुलपाखरे, सरपटणारे प्राणी आणि विविध स्थानिक वनस्पती आढळतात.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान (SGNP)
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान (SGNP)

या उद्यानाला ऐतिहासिक महत्त्वही आहे. पूर्वीचे कृष्णगिरी राष्ट्रीय उद्यान आणि बोरिवली राष्ट्रीय उद्यान यांचे एकत्रीकरण करून १९८१ मध्ये याला संजय गांधी यांचे नाव देण्यात आले.

पावसाळाच का आहे सर्वोत्तम?

जून ते सप्टेंबर या काळात संपूर्ण उद्यान दाट हिरवाईने नटते. ओढे, लहान धबधबे आणि निसर्गरम्य पायवाटा यामुळे हा काळ ट्रेकिंग आणि निसर्गभ्रमंतीसाठी सर्वोत्तम मानला जातो. मात्र, पावसामुळे अनेक मार्ग घसरडे होतात. त्यामुळे मजबूत ग्रिप असलेले बूट घालणे आवश्यक आहे.

उद्यानात काय पाहता येईल?

साहसी भटकंतीची आवड असलेल्यांसाठी शिलोंडा नेचर ट्रेल हा नवशिक्यांसाठी उत्तम पर्याय आहे. अनुभवी ट्रेकर्स पीकॉक पॉइंट, स्नेक ट्रेल, गौमुख आणि भूत बंगला ट्रेल अशा मार्गांवर जाऊ शकतात.

उद्यान प्रशासनाकडून मार्गदर्शित ट्रेक, पक्षीनिरीक्षण, फुलपाखरांची सफर आणि सायकलिंग यांसारखे उपक्रमही आयोजित केले जातात.

कन्हेरी लेणी ठरतात मुख्य आकर्षण

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील कन्हेरी लेणी हे पर्यटकांसाठी सर्वात मोठे आकर्षण आहे. काळ्या बेसॉल्ट खडकात कोरलेला हा प्राचीन बौद्ध लेणी समूह इतिहासप्रेमींसाठी खास अनुभव देतो.

लेण्यांपर्यंत जाण्यासाठी उद्यानातील बस, भाड्याने सायकल किंवा पायी चालण्याचा पर्याय उपलब्ध आहे.

वन्यजीवांचीही मिळते झलक

येथील लायन अँड टायगर सफारी पर्यटकांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. विशेष वाहनातून संरक्षित परिसरात फिरताना सिंह आणि वाघांचे जवळून दर्शन घेता येते.

याशिवाय उद्यानात बिबट्या, चितळ, सांबर, साळींदर तसेच इतर अनेक वन्य प्राणी नैसर्गिक अधिवासात आढळतात.

Monsoon Tourism : पावसाळ्यात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला भेट देणार आहात? मग ही माहिती नक्की वाचा
Monsoon Travel : मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहेत 'ही' ५ निसर्गरम्य ठिकाणं; पावसाळ्यात रोड ट्रिपसाठी बेस्ट डेस्टिनेशन्स

कसे पोहोचाल?

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली (पूर्व) येथे वेस्टर्न एक्स्प्रेस महामार्गालगत आहे.

  • जवळचे रेल्वे स्थानक : बोरिवली

  • जवळचे मेट्रो स्थानक : राष्ट्रीय उद्यान (Rashtriya Udyan) मेट्रो स्टेशन – मेट्रो मार्ग ७

उद्यान मंगळवार ते रविवार सकाळी ७.३० ते सायंकाळी ६.३० या वेळेत खुले असते. सोमवारी उद्यान बंद असते.

उद्यानात खासगी वाहनांना प्रवेश नाही

उद्यानाच्या आत खासगी वाहनांना प्रवेश दिला जात नाही. पर्यटक BEST बस, बग्गी सेवा किंवा भाड्याने मिळणाऱ्या सायकलींचा वापर करून विविध ठिकाणी जाऊ शकतात.

जाण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा

  • सफारी आणि इतर उपक्रमांची तिकिटे शक्यतो ऑनलाइन आगाऊ बुक करा.

  • सकाळी लवकर पोहोचल्यास हवामान आल्हाददायक असते आणि वन्यजीव दिसण्याची शक्यता अधिक असते.

  • पिण्याचे पाणी, हलका खाऊ आणि आरामदायी ट्रेकिंग शूज सोबत ठेवा.

  • ठरवून दिलेल्या मार्गावरूनच फिरा आणि परिसरात कचरा टाकणे टाळा.

  • दुपारच्या विश्रांतीदरम्यान काही उपक्रम तात्पुरते बंद असू शकतात.

  • उद्यानाचा शांतपणे आणि निवांत अनुभव घ्यायचा असेल, तर सायकल भाड्याने घेणे हा सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in