Mumbai : मुलुंड डम्पिंग ग्राऊंडला युद्धाचा फटका; डिझेलच्या कमतरतेमुळे काम करणे अशक्य, कचरा वाहून नेण्यासाठी होतेय अडचण

इराण-इस्रायल आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम जगभरात जाणवू लागला आहे.
Mumbai : मुलुंड डम्पिंग ग्राऊंडला युद्धाचा फटका; डिझेलच्या कमतरतेमुळे काम करणे अशक्य, कचरा वाहून नेण्यासाठी होतेय अडचण
Mumbai : मुलुंड डम्पिंग ग्राऊंडला युद्धाचा फटका; डिझेलच्या कमतरतेमुळे काम करणे अशक्य, कचरा वाहून नेण्यासाठी होतेय अडचण (संग्रहित छायाचित्र)
Published on

मुंबई : इराण-इस्रायल आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम जगभरात जाणवू लागला आहे. मुंबईतील मुलुंड डम्पिंग ग्राऊंडवरील कचरा वाहून नेण्यासाठी वाहनांना डिझेलची कमतरता भासत आहे. तसेच अन्य कामांसाठी डिझेल उपलब्ध होत नसल्याने मुलुंड डम्पिंग ग्राऊंडवरील विविध कामात अडचणी येत आहेत. डिझेलची उपलब्धता होत नसल्याने कंत्राटाची मुदत वाढ द्यावी, अशी मागणी संबंधित कंत्राटदाराने पालिका प्रशासनाकडे केली आहे.

दरम्यान, कंत्राटदारास मुदतवाढ द्यायची की नाही यावर दोन दिवसांत निर्णय होणार आहे. मुलुंड डम्पिंग ग्राऊंडची कचरा साठवण क्षमता ही ७० लाख मेट्रिक टन आहे. या डम्पिंग ग्राऊंडमधील कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावण्याचे काम सहा वर्षासाठी कंत्राटदाराला देण्यात आले होते. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात काही महिने काम थांबल्याने कंत्राटदाराला मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे जून २०२५ पर्यंत कचरा विल्हेवाटीची मुदत कंत्राटदाराला दिली होती. यासाठी कंत्राटदारांसोबत प्रत्येक टनामागे ७९८ रुपये याप्रमाणे ५५८ कोटी रुपयांचा करारही केला. मात्र त्या मुदतीत कंत्राटदाराने काम पूर्ण केले नाही. त्यानंतर कंत्राटदाराला वारंवार मुदतवाढ देण्यात येऊ लागली.

Mumbai : मुलुंड डम्पिंग ग्राऊंडला युद्धाचा फटका; डिझेलच्या कमतरतेमुळे काम करणे अशक्य, कचरा वाहून नेण्यासाठी होतेय अडचण
कांजूर डम्पिंग ग्राऊंडवर हरित क्षेत्राची निर्मिती; दुर्गंधी मुक्तीसाठी बफर झोनमध्ये विशिष्ट १५ हजार झाडांची लागवड; अश्विनी भिडेंनी केली पाहाणी

कंत्राटदाराला एप्रिल २०२६ पर्यंत मुदतवाढ देऊन कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे उद्दिष्ट दिले. त्यानंतरही मुदतीत काम पूर्ण न झाल्याने २७ मे २०२६ पर्यंत मुदतवाढ़ दिली. मात्र आता कंत्राटदराने तब्बल २७० दिवसांची मुदतवाढ मागितली आहे.

७० लाख मेट्रिक टनपैकी संपूर्ण कचऱ्यावर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. मात्र यातील शास्त्रोक्त प्रक्रिया केलेल्या आठ लाख मेट्रिक टन कचऱ्याची वाहतूक करणे कठीण झाले आहे. हा कचरा डम्पिंग ग्राऊंडमध्ये असून डिझेल इंधनाअभावी त्याचे वहन वेगाने होऊ शकलेले नाही. यातील कचरा वेगळा करून त्यातील प्लास्टिक कचरा रिसायकलिंग ठिकाणी वहन करून नेला जातो.

कचरा वहनाच्या फेऱ्या निम्म्याने घटल्या

दररोज ६०० ते ७०० फेऱ्या कचरा वाहन गाड्यांच्या होतात. मात्र आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे डिझेलचा तुटवडा जाणवत असून त्याचा परिणाम मुलुंड डम्पिंग ग्राऊंडमधील कचरा वहन प्रक्रियेवर होऊ लागला आहे. आता दररोज २०० ते ३०० फेऱ्या कचरा वहनाच्या होत आहेत. यापूर्वी १२ ते १५ हजार डिझेल कचरा वाहन गाड्यांसाठी लागत होते. मात्र आता डिझेलची कमतरता भासत असल्याने चार ते पाच हजार लिटर डिझेल उपलब्ध होत आहे. परिणामी, कामावर परिणाम होऊ लागला. त्यातच डम्पिंग ग्राऊंडमधील अन्य कामासाठीही डिझेल इंधनाचा तुटवडा जाणवू लागल्याने २७० दिवसांची मुदतवाढ़ द्यावी, अशी मागणी करणारे पत्र महापालिका प्रशासनाला संबंधित कंत्राटदाराने दिले आहे.

logo
marathi.freepressjournal.in