मुंबई, ठाणे, कोकणात आज 'कोसळ'धार; पुणे घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता

राज्यात पावसाने काहीशी विश्रांती घेतल्यानंतर मंगळवार नंतर आता बुधवारी (दि.१२) पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. अरबी समुद्रावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे कोकण आणि लगतच्या घाटमाथ्यावर पावसासाठी पुन्हा अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे.
मुंबई, ठाणे, कोकणात आज 'कोसळ'धार; पुणे घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता
मुंबई, ठाणे, कोकणात आज 'कोसळ'धार; पुणे घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यतासंग्रहित छायाचित्र : विजय गोहिल
Published on

मुंबई : राज्यात पावसाने काहीशी विश्रांती घेतल्यानंतर मंगळवार नंतर आता बुधवारी (दि.१२) पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. अरबी समुद्रावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे कोकण आणि लगतच्या घाटमाथ्यावर पावसासाठी पुन्हा अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडसह ९ जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या, तर काही ठिकाणी मुसळधार सरी बरसण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

या हवामान बदलांमुळे पुढील दोन दिवस कोकण तसेच मध्य महाराष्ट्रातील विविध भागांत जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून पुणे घाटमाथ्यासाठी हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

महाराष्ट्रात सध्या सर्वच भागांत मुसळधार पावसाची स्थिती नसली तरी पुढील काही दिवसांत पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः गुरूवार १३ ऑगस्टपासून राज्यातील काही भागांमध्ये पावसाची तीव्रता वाढू शकते, अशी माहिती आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र, आता हवामानात पुन्हा बदल होण्याचे संकेत आहेत

रत्नागिरी, सिंधुदुर्गातही काही ठिकाणी मुसळधार

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. पालघरमध्ये मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठाणे आणि मुंबईत काही ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो. रायगडमध्ये काही ठिकाणी मुसळधार, तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्येही काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. या पाच ठिकाणी पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

कोकण, घाटमाथ्याला अधिक फटका?

हवामान विभागाने एक महत्त्वपूर्ण अंदाज जाहीर केला आहे. येत्या २४ तासांत बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याचा इशारा दिला आहे. तसेच    गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याचे चित्र आहे. मात्र, मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची चिन्हे दिसत असून १३ ऑगस्टपासून राज्यातील काही भागांत पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. कोकण, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांना याचा अधिक फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी पुढील काही दिवस हवामान विभागाच्या सूचनांकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

पुणे घाट परिसरात ‘ऑरेंज अलर्ट’ जारी

पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांच्या बहुतांश भागांत हलका ते मध्यम पाऊस राहण्याचा अंदाज आहे. मात्र, पुणे घाट परिसरात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याने ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. कोल्हापूर आणि सातारा घाटमाथ्यावरही काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याने यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. सांगलीत हलका ते मध्यम, तर सोलापूरमध्ये हलका पाऊस राहण्याचा अंदाज आहे.

ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांत पावसाने उघडीप दिली होती, परंतु आता पुन्हा एकदा मुसळधार पावसाचे आगमन होत आहे. नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in