Mumbai : पाणीगळती रोखण्यास परदेशी तंत्रज्ञान वापरणार; सिंगापूर, जर्मनी, फ्रान्सच्या कंपन्यांकडून मागवणार निविदा  

मुंबईत गळतीमुळे वाया जाणारे लाखो लीटर पाणी रोखण्यासाठी आता परदेशी कंपन्यांच्या तंत्रज्ञानाचा आधार घेतला जाणार आहे.
Mumbai : पाणीगळती रोखण्यास परदेशी तंत्रज्ञान वापरणार; सिंगापूर, जर्मनी, फ्रान्सच्या कंपन्यांकडून मागवणार निविदा  
Mumbai : पाणीगळती रोखण्यास परदेशी तंत्रज्ञान वापरणार; सिंगापूर, जर्मनी, फ्रान्सच्या कंपन्यांकडून मागवणार निविदा  
Published on

मुंबई : मुंबईत गळतीमुळे वाया जाणारे लाखो लीटर पाणी रोखण्यासाठी आता परदेशी कंपन्यांच्या तंत्रज्ञानाचा आधार घेतला जाणार आहे. ब्रिटन, मलेशिया, जपान, जर्मनी, फ्रान्स या देशात पाणी गळतीचा शोध घेण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञान उपलब्ध असून मुंबईत त्याचा वापर केला तर लाखो लिटर पाण्याची बचत होईल, असा विश्वास मुंबई महापालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे या तंत्रज्ञानामुळे रस्ते वाहतूक न थांबवता गळतीचा शोध घेणे शक्य होणार आहे.

मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा  तानसा, तुळशी व विहार या सात धरणातून मुंबईला दररोज चार हजार दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. १२० किलोमीटर अंतरावरुन मुंबईची तहान भागवण्यासाठी जलवाहिन्यांचे जाळे विस्तारले आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या ब्रिटीशकालीन असून जीर्ण झाल्या आहेत. त्यामुळे जलवाहिनीला गळती लागण्याचे प्रकार गेल्या काही वर्षांत वारंवार घडू लागले आहेत. सध्या ९०० दशलक्ष लिटर पाणी गळतीमुळे वाया जाते.

रात्रीही पाणी गळतीचा शोध घेणे होणार शक्य

मुंबईतील रस्ते सिमेंट काँक्रिटचे होत असल्याने जलवाहिनीला गळती लागली तर शोध घेणे कठीण होते. रस्त्यांखाली सीसीटीव्ही टी १० यंत्रणेचा वापर केला जातो. मात्र मूळ समस्या शोधण्यासाठी मुंबई महापालिकेकडे अद्ययावत तंत्रज्ञान उपलब्ध नाही. फ्रान्स सिंगापूर, ब्रिटन, मलेशिया, जपान, जर्मनी या देशात ते उपलब्ध असून त्याचा वापर कसा करायचा याची माहिती घेण्यात येणार आहे. यामुळे रात्रीच्या वेळी पाणी गळतीचा शोध घेऊनही त्यावर उपाय करणे शक्य होणार आहे. यासाठी विदेशी कंपन्यांना मुंबई महापालिकेने साद घातली आहे.

Mumbai : पाणीगळती रोखण्यास परदेशी तंत्रज्ञान वापरणार; सिंगापूर, जर्मनी, फ्रान्सच्या कंपन्यांकडून मागवणार निविदा  
मुंबईत शुक्रवारपासून १० टक्के पाणी कपात; धरणात फक्त २३ टक्के साठा, अपव्यय टाळण्याचे पालिकेचे मुंबईकरांना आवाहन

नवीन तंत्रज्ञानाचा असा होणार वापर!

भूमिगत पाण्याच्या मुख्य वाहिन्या, मॅनहोल, कंट्रोल व्हॉल्व्ह यासारख्या विद्यमान प्रवेश बिंदूंमधून तपासणी केली जाईल. हे तंत्रज्ञान काँक्रिट किंवा डांबरी रस्त्यांखाली टाकलेल्या मृदू पोलाद, ओतीव लोखंडच्या असलेल्या मुख्य जलवाहिन्यांमधील ६-७ मीटर खोलीपर्यंतची गळती शोधण्यास उपयुक्त ठरणार आहे. 

पाणी वितरणाचे जाळे गुंतागुंतीचे

मुंबई शहरातील पाणी वितरण जाळे अत्यंत गुंतागुंतीचे आहे. या जाळ्यामध्ये ५० मिमी ते २२०० मिमी व्यासाच्या विविध आकारांच्या मुख्य जलवाहिन्यांचा समावेश आहे. ३०० मिमी व्यासापेक्षा कमी असलेल्या बहुतांश जलवाहिन्या जमिनीपासून साधारणपणे ३ ते ४ फूट खोली असतात. त्यामुळे अद्ययावत तंत्रज्ञान नसल्याने गळती शोधणे कठीण होते. त्यामुळे अद्ययावत तंत्रज्ञान ज्या विदेशी कंपन्यांकडे उपलब्ध आहे, अशा कंपन्यांकडून अद्ययावत तंत्रज्ञान उपलब्ध व्हावे, यासाठी मुंबई पालिकेने प्रयत्न सुरू केल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

गळती शोधण्यासाठी नवीन तंत्रज्ञान

१. ग्राऊंड मायक्रोफोन्स

२. गळतीचा आवाज ओळखणारी यंत्रणा म्हणजेच साऊंड लॉगर्स

३. एआयचलित गळती शोध साधने

४. ट्रेसर गॅस

logo
marathi.freepressjournal.in