Mumbai : सेबीचा दंड न भरणाऱ्या व्यापाऱ्याला शिक्षा

भारतीय रोखे आणि विनिमय मंडळाचा (सेबी) ५ लाख रुपयांचा दंड वेळेत न भरणे काळबादेवी येथील व्यापाऱ्याला चांगलेच महागात पडले.
Mumbai : सेबीचा दंड न भरणाऱ्या व्यापाऱ्याला शिक्षा
Mumbai : सेबीचा दंड न भरणाऱ्या व्यापाऱ्याला शिक्षा
Published on

मुंबई : भारतीय रोखे आणि विनिमय मंडळाचा (सेबी) ५ लाख रुपयांचा दंड वेळेत न भरणे काळबादेवी येथील व्यापाऱ्याला चांगलेच महागात पडले. सेबीचा दंड न भरल्याच्या आरोपाखाली दोषी ठरवून सेबी विशेष न्यायालयाने व्यापाऱ्याला एक महिन्याच्या साध्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. तसेच ५ लाख रुपयांचा अतिरिक्त दंडही ठोठावला. जिगर घोघारी असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.

सेबीने २००९ ते २०१० दरम्यान 'एलजीएस ग्लोबल लिमिटेड' या कंपनीच्या शेअर्समधील संशयास्पद दरवाढ आणि व्यवहारांची चौकशी केली होती. त्या चौकशीत नियमांचे उल्लंघन झाल्याचे उघडकीस आल्यानंतर सेबीच्या अधिकाऱ्यांनी २३ सप्टेंबर २०१४ रोजी आरोपी जिगर घोघारी याला ५ लाख रुपयांचा दंड ठोठावला होता.

Mumbai : सेबीचा दंड न भरणाऱ्या व्यापाऱ्याला शिक्षा
Mumbai : झडती घेणे ही औपचारिकता नाही; ड्रग्ज प्रकरणातील आरोपीची सत्र न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता

त्या आदेशाविरोधात व्यापारी घोघारीने 'सॅट' न्यायाधिकरणाकडे दाद मागितली होती. मात्र, १५ फेब्रुवारी २०१६ रोजी व्यापाऱ्याने अपील मागे घेतले. त्यावेळी न्यायालयाने त्याला दंड भरण्यासाठी ३ महिन्यांची मुदत दिली होती. तथापि, न्यायालयाची मुदत संपल्यानंतरही आरोपीने दंड जमा केला नाही. त्यामुळे सेबीने त्याच्याविरुद्ध 'सेबी कायदा १९९२' च्या कलम २४(२) अंतर्गत फौजदारी खटला दाखल केला होता. याप्रकरणी विशेष सेबी न्यायाधीश आर. एम. जाधव यांनी निकाल दिला. न्यायालयाने आरोपीचे बचावाचे सर्व युक्तिवाद फेटाळून लावले.

logo
marathi.freepressjournal.in