BMC Election : मुंबईकरांनो लक्ष द्या! 'या' मार्गांवर प्रवेश बंद; १४ ते १६ जानेवारीदरम्यान वाहतूक निर्बंध; जाणून घ्या पर्यायी मार्ग

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, मुंबई वाहतूक पोलिसांनी दादर, वरळी आणि अंधेरीसह अनेक भागात तात्पुरते रस्ते बंद आणि नो-पार्किंग झोन लागू केले आहेत. निर्बंधांमध्ये अनेक प्रमुख भागांचा समावेश आहे. पर्यायी मार्ग जाणून घ्या.
BMC Election : मुंबईकरांनो लक्ष द्या! 'या' मार्गांवर प्रवेश बंद; १४ ते १६ जानेवारीदरम्यान वाहतूक निर्बंध; जाणून घ्या पर्यायी मार्ग
Published on

राज्यासह मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी उद्या १५ जानेवारीला मतदान होणार आहे. याच पार्श्वभूमीवर दादर, अंधेरी आणि वरळी परिसरातील वाहतूक मार्गांत मोठे बदल करण्यात आले आहेत. १४ ते १६ जानेवारीदरम्यान मतदान केंद्र, ईव्हीएम वितरण, स्ट्रॉंग रूम आणि मतमोजणीची व्यवस्था असल्याने मुंबई वाहतूक पोलिसांनी वाहनचालकांसाठी नियम लागू केले आहेत.

दादरमधील वाहतूक बदल

मुंबई वाहतूक विभागाने जाहीर केलेल्या सूचनेनुसार,  दादर (पश्चिम) येथील डॉ. अँटोनिया डी’सिल्वा हायस्कूल येथे निवडणूक कार्यालय आणि स्ट्रॉंग रूम उभारण्यात आले आहेत. १३ ते १५ जानेवारीदरम्यान मतदान साहित्य आणि ईव्हीएम मशीनचे वितरण येथे होत असून, १६ जानेवारीला मतमोजणीही याच शाळेत होणार आहे. या परिसरात १४ जानेवारी सकाळी ८ वाजल्यापासून १६ जानेवारी मध्यरात्रीपर्यंत वाहतूक नियम लागू असतील.

कोणते मार्ग बंद?

  • रावबहादूर एस. के. बोले मार्ग: ज्ञान मंदिर चौक ते हनुमान मंदिर चौक

  • अशोक वृक्ष रोड: डी’सिल्वा हायस्कूलपासून किर्तीचंद्र सुरेश्वरजी महाराज चौक ते रानडे रोड

  • रानडे रोड: बाबा सावरकर चौक ते अण्णा टिपणीस चौक

नो एंट्री / नो पार्किंग

जी. एम. भोसले मार्गावर वरळी नाका ते कुरणे चौकपर्यंत दोन्ही लेनवर पार्किंग बंद असून एंट्री देखील बंद आहे.

पर्यायी मार्ग

वरळी नाक्याकडून कुरणे चौकाकडे जाणारी वाहने डॉ. अ‍ॅनी बेझंट रोड किंवा गणपतराव कदम मार्गाने पुढे जाऊ शकतात.

वरळीतील वाहतूक बदल

सूचनेनुसार, वरळीच्या जांबोरी मैदानात ईव्हीएम आणि निवडणुकीचे साहित्य वितरण/संकलन केंद्र उभारण्यात येणार आहे. १४ जानेवारी रात्री १२ पासून १५ जानेवारी मध्यरात्रीपर्यंत वाहतूकीच्या मार्गात बदल करण्यात आला असून १६ जानेवारीला सकाळी ५ ते मध्यरात्रीपर्यंत, बीएमसी इंजिनिअरिंग हब (वरळी) येथे होणाऱ्या मतमोजणीमुळे डॉ. ई. मोझेस रोडवर नो पार्किंग आणि नो एंट्री लागू करण्यात आली आहे.

पर्यायी मार्ग

  • महालक्ष्मी स्थानक ते वरळी नाका:
    नेहरू सायन्स सेंटर → दैऩिक शिवनेर मार्ग → श्रीराम मिल नाका → पुढची दिशा

  • वरळी नाका ते महालक्ष्मी स्थानक:
    गणपतराव कदम मार्ग → श्रीराम मिल नाका → दैनिक शिवनेर मार्ग → महालक्ष्मी

अंधेरीतील वाहतूक बदल

माहितीनुसार, अंधेरीतील गुंदवली महानगरपालिका शाळेत निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय आणि स्ट्रॉंग रूम असल्याने १६ जानेवारीला अंधेरी-कुर्ला लिंक रोडवर बदल लागू आहेत. १६ जानेवारीला सकाळी ६ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत अंधेरी-कुर्ला रोडवरील दोन्ही लेन कै.रमेश मोरे चौक ते वेस्टर्न एक्सप्रेस हायवे (टॅब जंक्शन) पर्यंत पूर्णपणे बंद असणार आहे.

पर्यायी मार्ग

सर्व वाहनांनी चकाला जंक्शन → डावे वळण → बी.डी. सावंत जंक्शन → उजवे वळण → बिस्लेरी जंक्शन →डावे वळण → बहार जंक्शन → उजवे वळण → सहार रोड मार्गे अंधेरी स्टेशन या मार्गाचा वापर करावा.

अत्यावश्यक सेवेतील वाहनांना सूट

मिळालेल्या माहितीनुसार, या सर्व निर्बंधांपासून सरकारी वाहने, पोलीस वाहने, अग्निशामक दल, रुग्णवाहिका, अधिकृत परवानाधारक वाहने या अत्यावश्यक सेवेतील वाहनांना सूट देण्यात आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in