Mumbai : वडाळ्यात ट्रॅफिक बदल; 'हा' रस्ता २२ मेपर्यंत बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग

वडाळा मोनोरेल परिसरात सेव्हरेज लाईन कामामुळे २४ मार्चपासून वाहतुकीत बदल करण्यात आले असून वाहतूक विभागाकडून पर्यायी मार्ग जाहीर करण्यात आले आहेत.
Mumbai : वडाळ्यात ट्रॅफिक बदल; 'हा' रस्ता २२ मेपर्यंत बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग
(प्रातिनिधिक प्रतिमा)
Published on

मुंबईत सांडपाणी (Sewerage) लाईनच्या कामासाठी वडाळा मोनोरेल मार्गावर वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. मुंबई ट्रॅफिक पोलिसांनी याबाबत सविस्तर सूचना जारी केली आहे.

महापालिकेकडून मोनोरेल पोल क्रमांक L-३२२ (उत्तर दिशेकडे) ते वडाळा डेपो मोनोरेल स्थानकादरम्यान सेव्हरेज लाईनचे काम सुरू आहे.

या ठिकाणी २५ फूट व्यासाचा आणि २० फूट खोल खड्डा खोदण्यात आला आहे. त्यामुळे वाहतुकीसाठी फक्त ३.२५ फूट जागा उरली आहे. याच पार्श्वभूमीवर अपघाताचा धोका लक्षात घेऊन वाहतूक वळविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

किती दिवस राहणार बदल?

हे वाहतूक बदल २४ मार्च रात्री १२:०१ वाजेपासून २२ मे रात्री १२:०० पर्यंत असणार आहेत.

बंद असलेला मार्ग

आरटीओ चौक ते वडाळा डेपो मोनोरेल स्थानक (उत्तर दिशेचा मार्ग) हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आला आहे.

पर्यायी मार्ग

  • आरटीओ चौक ते वडाळा मोनोरेल स्थानक (दक्षिण दिशेचा मार्ग) हा रस्ता आता दोन्ही बाजूंच्या वाहतुकीसाठी खुला ठेवण्यात आला आहे.

  • वडाळा डेपो मोनोरेल स्थानकाजवळ पुढील उपलब्ध जागेतून वाहनांना पुन्हा मूळ उत्तर दिशेच्या मार्गावर वळण्याची सोय करण्यात आली आहे.

नागरिकांना सूचना

ट्रॅफिक पोलिसांनी नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा तसेच वाहतूक नियमांचे पालन करावे असे आवाहन केले आहे, जेणेकरून या कामादरम्यान कोणतीही गैरसोय किंवा अपघात टाळता येईल.

logo
marathi.freepressjournal.in