Mumbai : नाहूरमध्ये ४८ व्या मजल्यावरून कोसळून दोन कामगारांचा मृत्यू; केबल तुटल्याने भीषण दुर्घटना

नाहूरमध्ये निर्माणाधीन इमारतीच्या ४८ व्या मजल्यावर काम करताना प्लॅटफॉर्मची केबल तुटल्याने दोन कामगारांचा मृत्यू झाला. सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Mumbai : नाहूरमध्ये ४८ व्या मजल्यावरून कोसळून दोन कामगारांचा मृत्यू; केबल तुटल्याने भीषण दुर्घटना
Mumbai : नाहूरमध्ये ४८ व्या मजल्यावरून कोसळून दोन कामगारांचा मृत्यू; केबल तुटल्याने भीषण दुर्घटना'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on: 

मुंबई : नाहूरमध्ये बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या ४८ व्या मजल्यावर काम करत असताना केबल तुटल्याने दोन कामगारांचा खाली कोसळून मृत्यू झाला. सैफ अली (२१) आणि मोहम्मद सुहेब (३१) अशी मृतांची नावे आहेत. ही दुर्घटना शनिवारी (दि. १०) ऐरोली-भांडुप मार्गावरील पायोनियर हाऊसिंग सोसायटीच्या ‘सनरूफ प्रोजेक्ट’मध्ये घडली. या प्रकरणी सुरक्षेच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष केल्याच्या आरोपावरून नवघर पोलिसांनी संबंधित ठेकेदार आणि पर्यवेक्षकासह इतरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

नेमकं काय घडलं?

इमारतीच्या बाहेरील भागात विद्युत दिवे बसवण्याचं काम सुरू होतं. तीन कामगारांनी ४७ व्या मजल्यावरील काम पूर्ण करून ४८ व्या मजल्यावर काम सुरू केलं होतं. त्यासाठी केबलच्या साहाय्याने लटकवलेल्या प्लॅटफॉर्मचा वापर केला जात होता. मात्र, अचानक प्लॅटफॉर्मला आधार देणारी एका बाजूची केबल तुटली. त्यामुळे प्लॅटफॉर्म तिरका झाला आणि दोन कामगार खाली कोसळले.

दुर्घटनेतून बचावलेल्या मोहम्मद इम्रान शेख (२४) याच्या माहितीनुसार, दोन्ही कामगार सुरक्षा पट्टा बांधत असतानाच केबल तुटली. त्यामुळे त्यांना स्वतःचा बचाव करता आला नाही. इम्रानने वेळीच सुरक्षा पट्टा बांधल्याने त्याचा जीव वाचला. अपघातानंतर दोघांना मुलुंड येथील वीर सावरकर रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

Mumbai : नाहूरमध्ये ४८ व्या मजल्यावरून कोसळून दोन कामगारांचा मृत्यू; केबल तुटल्याने भीषण दुर्घटना
Virar : जीवदानी देवीच्या दर्शनाला निघालेल्या मायलेकीवर काळाचा घाला! टँकरच्या धडकेत आईसह ४ वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू

सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप

पोलिस तपासानुसार, मृत कामगार ‘फसाद लाइटिंग सर्व्हिसेस’ या कंपनीत कार्यरत होते. कामाच्या ठिकाणी आवश्यक संरक्षक जाळी आणि इतर सुरक्षा व्यवस्था पुरेशा प्रमाणात नसल्याचा आरोप आहे. तसेच कामगारांनी सुरक्षा पट्टे बांधल्याची खात्री करण्याकडेही दुर्लक्ष झाल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.

या प्रकरणी नवघर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०६(१) आणि ३(५) अंतर्गत ठेकेदार कंपनीचे मालक, पर्यवेक्षक, प्लॅटफॉर्मच्या देखभालीसाठी जबाबदार संस्थेचे प्रतिनिधी आणि इतर संबंधितांविरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in