Virar : जीवदानी देवीच्या दर्शनाला निघालेल्या मायलेकीवर काळाचा घाला! टँकरच्या धडकेत आईसह ४ वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू

विरारमध्ये जीवदानी देवीच्या दर्शनासाठी निघालेल्या मायलेकींचा टँकरच्या धडकेत मृत्यू झाला. नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी कोपरी नाका येथे झालेल्या अपघातात २९ वर्षीय आई आणि ४ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला.
Virar : जीवदानी देवीच्या दर्शनाला निघालेल्या मायलेकीवर काळाचा घाला! टँकरच्या धडकेत आईसह ४ वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू
Virar : जीवदानी देवीच्या दर्शनाला निघालेल्या मायलेकीवर काळाचा घाला! टँकरच्या धडकेत आईसह ४ वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यूप्रातिनिधिक छायाचित्र
Published on: 

विरार : नवरात्रीच्या उत्साहात विरारमधून एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. जीवदानी देवीचं दर्शन घेण्यासाठी घरातून निघालेल्या मायलेकीचा भीषण अपघातात मृत्यू झाला. सोमवारी (दि. १२) सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास विरारच्या कोपरी नाका परिसरात एका टँकरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात आई आणि तिच्या अवघ्या ४ वर्षांच्या मुलीने जागीच प्राण गमावले.

देवीच्या दर्शनासाठी निघाल्या अन् वाटेतच...

मिळालेल्या माहितीनुसार, कविता पाल (२९) आणि त्यांची मुलगी आरायू पाल (४) अशी मृत मायलेकीची नावं आहेत. दोघी वसईतील गावराईपाडा येथील रहिवासी होत्या.

नवरात्रीनिमित्त जीवदानी देवीचं दर्शन घेण्यासाठी त्या सोमवारी सकाळी दुचाकीवरून विरारच्या दिशेने निघाल्या होत्या. मात्र, सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास त्यांची दुचाकी कोपरी नाका परिसरात पोहोचली असता पाठीमागून येणाऱ्या टँकरने तिला जोरदार धडक दिली.

ही धडक इतकी भीषण होती की, कविता पाल आणि त्यांची चिमुकली आरायू यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. देवीच्या दर्शनासाठी निघालेल्या मायलेकीवर वाटेतच काळाने घाला घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

टँकरचालक पोलिसांच्या ताब्यात

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी संबंधित टँकरचालकाला ताब्यात घेतलं असून, अपघाताच्या नेमक्या कारणाचा तपास सुरू आहे. टँकरचा वेग किती होता आणि अपघात नेमका कसा घडला, याबाबत पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. तपासातून पुढील माहिती स्पष्ट होणार आहे.

Virar : जीवदानी देवीच्या दर्शनाला निघालेल्या मायलेकीवर काळाचा घाला! टँकरच्या धडकेत आईसह ४ वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू
Pune : "मुलीला घेऊन जा, नाहीतर..." जावयाचा रात्री फोन अन् काही तासांत IT इंजिनिअर वैष्णवीचा मृत्यू; हुंड्यासाठी छळाचा आरोप

नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी दुर्घटना

सध्या नवरात्रोत्सव सुरू असल्याने विरारच्या जीवदानी देवी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत आहे. अशातच देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या मायलेकीचा मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.

एकाच अपघातात आई आणि चार वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याने पाल कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुर्घटनेनंतर नागरिकांकडून हळहळ व्यक्त होत असून, अपघाताला नेमकं कोण जबाबदार आहे, हे पोलिस तपासातून स्पष्ट होणार आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in