Mumbai : फ्री प्रेस मार्गावर दुसऱ्या दिवशीही कारवाई; पालिका पथकाने १५ हून अधिक फेरीवाल्यांना हटवले

‘पादचारी प्रथम’ अभियानांतर्गत नरिमन पॉइंट येथील फ्री प्रेस जर्नल मार्गावरील फुटपाथवरच्या अतिक्रमणांवर सलग दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारीही हातोडा हाणण्यात आला. मुंबई महापालिकेच्या ‘ए’ वार्डने केलेल्या या कारवाई दरम्यान १५ हून अधिक फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला.
Mumbai : फ्री प्रेस मार्गावर दुसऱ्या दिवशीही कारवाई;  पालिका पथकाने १५ हून अधिक फेरीवाल्यांना हटवले
Mumbai : फ्री प्रेस मार्गावर दुसऱ्या दिवशीही कारवाई; पालिका पथकाने १५ हून अधिक फेरीवाल्यांना हटवले
Published on: 

मुंबई : ‘पादचारी प्रथम’ अभियानांतर्गत नरिमन पॉइंट येथील फ्री प्रेस जर्नल मार्गावरील फुटपाथवरच्या अतिक्रमणांवर सलग दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारीही हातोडा हाणण्यात आला. मुंबई महापालिकेच्या ‘ए’ वार्डने केलेल्या या कारवाई दरम्यान १५ हून अधिक फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. ‘अतिक्रमणमुक्त फुटपाथ’ ही कारवाई यापुढेही सुरूच राहणार असल्याचा इशारा ‘ए’ वार्डचे सहाय्यक आयुक्त उज्ज्वल इंगोले यांनी दिला आहे.

‘पादचारी प्रथम’ अभियानांतर्गत नरिमन पॉइंट येथील फ्री प्रेस जर्नल मार्गावरील फुटपाथवरच्या अतिक्रमणांवर सलग दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारीही हातोडा हाणण्यात आला.
‘पादचारी प्रथम’ अभियानांतर्गत नरिमन पॉइंट येथील फ्री प्रेस जर्नल मार्गावरील फुटपाथवरच्या अतिक्रमणांवर सलग दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारीही हातोडा हाणण्यात आला.

पदपथ हे पादचाऱ्यांना चालण्यासाठी असून ५० टक्के मुंबईकर याचा वापर करतात. त्यामुळे पादचाऱ्यांना सुरक्षित व सुलभ पदपथ मिळावेत यासाठी ‘पादचारी प्रथम’ हे अभियान राबविण्यात येत आहे. मुंबई महापालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे यांच्या आदेशानुसार पादचारी प्रथम अभियानांतर्गत कारवाईला २६ विभागीय कार्यालय क्षेत्रात वेग आला आहे.

नरिमन पॉइंट येथील फ्री प्रेस जर्नल मार्गावरच्या फुटपाथवरील बेकायदा फेरीवाले, बेकायदा बांधकामे स्टॉल, दुकाने हटवण्याची मोहीम बुधवारी राबविण्यात आली.
नरिमन पॉइंट येथील फ्री प्रेस जर्नल मार्गावरच्या फुटपाथवरील बेकायदा फेरीवाले, बेकायदा बांधकामे स्टॉल, दुकाने हटवण्याची मोहीम बुधवारी राबविण्यात आली.

नरिमन पॉइंट, बधवार पार्क येथे मोहीम

नरिमन पॉइंट येथील फ्री प्रेस जर्नल मार्गावरच्या फुटपाथवरील बेकायदा फेरीवाले, बेकायदा बांधकामे स्टॉल, दुकाने हटवण्याची मोहीम बुधवारी राबविण्यात आली. त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी पुन्हा एकदा ‘ए’ वार्डच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या माध्यमातून फ्री प्रेस जर्नल मार्गावर फुटपाथवरील बेकायदा बांधकामे, स्टॉल, तात्पुरत्या शेड जमीनदोस्त करण्यात आल्या.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in