
काही दिवसांपूर्वी भाजपचे (BJP) देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) यांचा पहाटेचा शपथविधी पुन्हा चर्चेत आला. याचे कारण म्हणजे जयंत पाटील (Jayant Patil) यांनी 'पहाटेची शपथविधी ही पवारांची खेळी असू शकते' असं विधान केले होते. त्यानंतर सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, 'पहाटेच्या शपथविधीबद्दल शरद पवारांना (Sharad Pawar) माहिती होती,' असे धक्कादायक विधान केले होते. त्यामुळे राज्याच्या राजकारणात पहाटेच्या शपथविधीचा जोरदार चर्चा सुरु झाली. मात्र, आता खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहाटेच्या शपथविधीबद्दल मोठे विधान केले आहे.
हेही वाचा :
पहाटेच्या शपथविधीबद्दल देवेंद्र फडणवीसांनी केला गौप्यस्फोट; म्हणाले, 'शरद पवारही...'
पहाटेचा शपथविधी ही शरद पवारांची खेळी?; राष्ट्रवादीच्या 'या' नेत्याच्या विधानाने खळबळ
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार पुण्यातील पत्रकार परिषदेत म्हणाले की, 'महाविकास आघाडी येण्यापूर्वी पहाटेचा शपथविधी झाला. त्यामुळे चांगली गोष्ट घडली की राष्ट्रपती राजवट उठली,' असे विधान केले. पहिल्यांदाच त्यांनी अशाप्रकारचे विधान केल्यामुळे आता राज्याच्या राजकारणात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. यापूर्वी देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या विधानावर शरद पवार म्हणाले होते की, "देवेंद्र फडणवीस हे असत्याची बाजू घेत बोलत आहेत." मात्र, आता त्यांच्या या नव्या विधानाने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.