Mumbai : पोलीस कोठडीतील आरोपींसाठी आता गणवेश

मुंबई पोलिसांनी कोठडीत असलेल्या आरोपींच्या सुरक्षिततेसाठी आणि अनुचित प्रकार रोखण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.
Mumbai : पोलीस कोठडीतील आरोपींसाठी आता गणवेश
Mumbai : पोलीस कोठडीतील आरोपींसाठी आता गणवेश'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

पूनम अपराज/मुंबई

मुंबई पोलिसांनी कोठडीत असलेल्या आरोपींच्या सुरक्षिततेसाठी आणि अनुचित प्रकार रोखण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. शहरातील जनरल लॉकअपमध्ये असलेल्या आरोपींसाठी आता मुंबई पोलिसांनी अधिकृत गणवेश लागू केला असून, सर्व आरोपींना आता या ठराविक पेहरावात राहावे लागणार आहे.

या नवीन नियमानुसार, पोलीस कोठडीत असलेल्या पुरुष संशयितांना मरून रंगाचे टी-शर्ट आणि हाफ पँट दिली जात आहे. आरोपीला अटक केल्यापासून ते त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत होईपर्यंत किंवा त्याची जामिनावर मुक्तता होईपर्यंत त्याला हाच गणवेश घालणे बंधनकारक असेल.

Mumbai : पोलीस कोठडीतील आरोपींसाठी आता गणवेश
Navi Mumbai : दहशतवाद्याच्या नावाने पोलिसांना 'फेक कॉल'; खोटी अफवा पसरवणारा आरोपी जेरबंद

पोलिसांनी प्रामुख्याने आरोपींच्या सुरक्षेसाठी हा उपक्रम राबवल्याचे सूत्रांनी सांगितले. यापूर्वी कोठडीत असताना स्वतःचे शर्ट, पँट, नाडी किंवा बेल्टचा वापर करून आरोपींनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या किंवा आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. आरोपी मानसिक तणावाखाली टोकाचे पाऊल उचलतात, त्यामुळे अशा गणवेशामुळे अशा घटना रोखण्यास मदत होईल, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

कोठडीतील व्यक्ती सुरक्षित राहावी, यासाठी नाडी नसलेली पँट आणि राऊंड नेक टी-शर्टचा समावेश असलेला हा गणवेश सुरू करण्यात आला आहे. कोठडीत होणाऱ्या आत्महत्येसारख्या घटना रोखणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे’, अशी माहिती सहायक पोलीस आयुक्त सचिन कदम यांनी दिली.

logo
marathi.freepressjournal.in