'त्या' ७०६ झाडांबाबत सविस्तर अहवाल सादर करा; हरित लवादाचे BMC ला निर्देश; पर्यायाबाबत विचारणा

एमएमआरडीएच्या पूर्व मुक्त मार्गाच्या घाटकोपर ते ठाणे या विस्तारीकरण प्रकल्पासाठी पूर्व द्रुतगती मार्गावरील तब्बल ७०६ झाडे तोडली जाणार असून, या वृक्षतोडीप्रकरणी हरित लवादाने मुंबई महानगरपालिकेला सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी पुढील सुनावणी २८ फेब्रुवारी रोजी होणार आहे.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

मुंबई : एमएमआरडीएच्या पूर्व मुक्त मार्गाच्या घाटकोपर ते ठाणे या विस्तारीकरण प्रकल्पासाठी पूर्व द्रुतगती मार्गावरील तब्बल ७०६ झाडे तोडली जाणार असून, या वृक्षतोडीप्रकरणी हरित लवादाने मुंबई महानगरपालिकेला सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी पुढील सुनावणी २८ फेब्रुवारी रोजी होणार आहे.

जलद प्राथमिक ठाणे ते घाटकोपर प्रवास अधिक व्हावा यासाठी एमएमआरडीएने १३ किलोमीटर लांबीच्या आणि ४० मीटर रुंदीच्या पूर्व मुक्त मार्गाच्या विस्तारीकरणाचा निर्णय घेतला आहे. प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी एमएमआरडीएने टप्प्यातील प्रक्रिया सुरू केली असून, यासाठी पूर्व द्रुतगती मार्गावरील ७०६ झाडे बाधित होणार आहेत. या ७०६ झाडांपैकी ३२० झाडे कापण्यात येणार असून, उर्वरित ३८६ झाडांचे पुनर्रोपण केले जाणार आहे.

झाडे तोडण्यास परवानगी देण्याचा प्रस्ताव एमएमआरडीएने याचिकेवरील सुनावणीदरम्यान हरित लवादाने किती झाडे कापली जाणार आहेत, त्यांचे पुनर्रोपण नेमके कुठे केले जाणार आहे, तसेच वृक्षतोडीऐवजी अन्य पर्याय उपलब्ध आहेत का, याबाबतचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश मुंबई महानगरपालिकेला दिले असल्याची माहिती याचिकाकर्ते अॅड. सागर देवरे यांनी दिली.

पालिकेच्या उद्यान विभागाकडे सादर केला आहे. मात्र, या प्रस्तावाला पर्यावरणप्रेमी, स्थानिक नागरिक तसेच पर्यावरण विषयावर कार्य करणाऱ्या विविध संघटनांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. पूर्व द्रुतगती मार्गावरील हिरवळ नष्ट होऊन पर्यावरणाचा ऱ्हास होईल, असा आरोप करत ७०६ झाडांची वृक्षतोड रद्द करण्याची मागणी आंदोलकांकडून करण्यात येत आहे.

logo
marathi.freepressjournal.in