Powai Hostage Case : माजी मंत्री दीपक केसरकरांचा जुना व्हिडिओ व्हायरल; रोहित आर्यच्या प्रकल्पाचं केलं होतं कौतुक

पवई येथील आरए स्टुडिओमधील ओलीस प्रकरणानंतर आता माजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचा एक जुना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दीपक केसरकर ओलीस प्रकरणातील आरोपी रोहित आर्यचे कौतुक करताना दिसत आहेत.
Powai Hostage Case : माजी मंत्री दीपक केसरकरांचा जुना व्हिडिओ व्हायरल; रोहित आर्यच्या प्रकल्पाचं केलं होतं कौतुक
Published on

पवई येथील आरए स्टुडिओमधील ओलीस प्रकरणानंतर आता माजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचा एक जुना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दीपक केसरकर ओलीस प्रकरणातील आरोपी रोहित आर्यचे कौतुक करताना दिसत आहेत. आर्यच्या संकल्पनेतून ‘स्वच्छता मॉनिटर’ हा सरकारी प्रकल्प राबवण्यात आला होता. या संदर्भातील हा व्हिडिओ असून रोहितने १ ऑक्टोबर २०२२ रोजी स्वत:च्या इंस्टाग्रामवर तो शेअर केला होता.

रोहित आर्यसोबत आगळा वेगळा उपक्रम

या व्हिडिओमध्ये दीपक केसरकर म्हणत आहेत, "श्री रोहित आर्य यांच्यासोबत एक आगळा वेगळा उपक्रम आयोजित केला आहे. याच्यामध्ये स्वच्छतेचे दूत ही सवय पाचवी ते आठवीच्या मुलांना लागावी. त्यांना 'स्वच्छता मॉनिटर' असं म्हणता येईल. आपण अजाणतेपणाने कचरा कुठेपण टाकतो. अशा वेळी एखाद्या लहान मुलाने आपल्याला सांगावं की कचरा डस्टबिनमध्ये टाकावा. तर आपण ते ऐकतो. असा गुणात्मक फरक हा घडू शकतो."

महात्मा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेलांचा संदेश

पुढे केसरकर म्हणतात, की "ही महात्मा गांधीनी देशाला दिलेली देणगी आहे. ही देणगी तशी शिस्त सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशाला दिलेली आहे. भारताला स्वच्छता हा महात्मा गांधीचा दिलेला संदेश होता. ज्याची २ ऑक्टोबर पासून अंमलबजावणी होतेय. त्याचं खरोखर मी कौतुक करतो. मुलांमध्ये या निमित्ताने स्वच्छतेची सवय वाढेल मी अपेक्षा करतो. या मुलांच्या माध्यमातून समाजालाही स्वच्छता राखण्याचा संदेश पोहोचेल अशी मी अपेक्षा करतो. सर्व नागरिक या उपक्रमाला प्रतिसाद देतील याची मी अपेक्षा करतो. त्या छोट्या मुलांच कौतुकही करतील. एक चांगला नागरिक बनून आपण स्वच्छतेसाठी कटिबद्ध कसे आहोत याची सुद्धा जाणीव करून देतील याची मला खात्री आहे," असे केसरकर म्हणाले.

संपूर्ण व्हिडिओ -

थकीत देयकांवरून निर्माण झाला वाद

हा व्हिडिओ २०२२ साली प्रसिद्ध करण्यात आला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात रोहित आर्य याने मांडलेल्या ‘माझी शाळा, सुंदर शाळा’ या संकल्पनेला प्रतिसाद देत सरकारने ‘स्वच्छता मॉनिटर’ची दोन कोटींची निविदा मंजूर केली होती. मात्र, या कामाचे त्याचे बिल थकीत होते. अनेक प्रयत्न करूनही कामाचे पैसे न मिळाल्याने त्याला नैराश्य आले होते. त्यासाठी त्याने आझाद मैदानावर आंदोलनही केले होते. मात्र, त्याच्या प्रयत्नांना यश न आल्याने त्यातून त्याने या ओलीस नाट्याची योजना आखली आणि ती प्रत्यक्षात आणली, असे सांगण्यात येते.

logo
marathi.freepressjournal.in