प्राजक्त तनपुरे यांचा आज भाजप प्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे राहुरी (जि. अहिल्यानगर) तालुक्यातील नेते आणि माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे शनिवारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
प्राजक्त तनपुरे यांचा आज भाजप प्रवेश
प्राजक्त तनपुरे यांचा आज भाजप प्रवेश(Photo-X)
Published on

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे राहुरी (जि. अहिल्यानगर) तालुक्यातील नेते आणि माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे शनिवारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत शनिवारी दुपारी ३ वाजता प्रदेश कार्यालयात तनपुरे यांचा प्रवेश सोहळा होईल. तनपुरे यांच्या प्रवेशाने राष्ट्रवादी शरद पवार गटाला अहिल्यानगर जिल्ह्यात धक्का बसला आहे.

प्राजक्त तनपुरे यांचा आज भाजप प्रवेश
जळगावच्या जागेसाठी महायुतीत रस्सीखेच; मंत्री गुलाबराव पाटील आपल्या पुत्रासाठी आग्रही

प्राजक्त तनपुरे यांनी शुक्रवारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी सुळे यांना भाजप प्रवेशाची माहिती दिली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राजक्त तनपुरे यांना विधान परिषदेच्या अहिल्यानगर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून उमेदवारी दिली जाणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in