
सध्या आयपीएल २०२३चे सामने सुरु असून दिल्ली कॅपिटल्सचा फलंदाज पृथ्वी शॉ हा आपल्या खराब कामगिरीही झुंज देत आहे. अशामध्ये त्याच्यासाठी आणखी धक्का म्हणजे अभिनेत्री सपना गिलसोबत झालेल्या वादावरून मुंबई उच्च न्यायालयाने त्याला नोटीस बजावली आहे. हे प्रकरण आता चांगलेच चिघळले असून पृथ्वी शॉसमोरील अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
हेही वाचा :
पृथ्वी शॉसोबत सेल्फी घेण्यावरून गोंधळ; घटनेचा व्हिडीओ व्हायरल
काही दिवसांपूर्वी अभिनेत्री आणि सोशल मीडिया स्टार असलेल्या सपना गिल आणि पृथ्वी शॉमध्ये सेल्फी घेण्यावरून चांगलाच वाद झाला होता. यासंदर्भातील व्हिडियो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. यानंतर शॉने तिच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर सपनाला तुरुंगवास भोगावा लागला होता. यानंतर तिने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. 'माझ्या विरोधातील दाखल केलेला गुन्हा रद्द करावा,' अशी मागणी तिने न्यायालयाकडे केली होती. याप्रकरणी आता क्रिकेटपटू पृथ्वी शॉसह ११ जणांना नोटीस पाठवली आहे.