
आज सकाळी मुंबई, ठाण्यामध्ये अनेक ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. यामुळे गरमीने हैराण झालेल्या मुंबईकरांना दिलासा तर मिळाला. पण, सकाळी आलेल्या या पावसामुळे कामावर जाणाऱ्या अनेक चाकरमान्यांचा गोंधळ उडाला. मुंबई, ठाण्यासह राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने आज हजेरी लावली.
दरम्यान, ठाणे परिसरात सकाळी काहीकाळ जोरदार पावसाने हजेरी लावली. तर, दुसरीकडे मुंबई उपनगरातील अंधेरी, विलेपार्ले, जोगेश्वरी परिसरात आज सकाळी जोरदार पाऊस झाला. या मुसळधार पावसामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचले होते. तसेच, राज्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये झालेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे जगप्रसिद्ध अजिंठा येथील वाघूर नदीला पूर आला. राज्यात अनेक ठिकाणी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांना मोठा फटका बसला.