आता फ्लडिंग पॉइंट्सवर पडणाऱ्या पावसाची नोंद होणार

पाऊस थांबल्यानंतर त्या ठिकाणचे पाणी किती वाजता ओसरले यांची रिअल टाईम नोंद होणार आहे
आता फ्लडिंग पॉइंट्सवर पडणाऱ्या पावसाची नोंद होणार

हिंदमाता, मिलन सब वे, किग्ज सर्कल, रेल्वे स्थानक आदी फ्लडिंग पॉइंट्सवर पडणाऱ्या पावसाची नोंद ठेवली जाणार आहे. फ्लडिंग पॉइंट्सच्या ठिकाणी किती पाऊस पडला, पाऊस थांबल्यानंतर त्या ठिकाणचे पाणी किती वाजता ओसरले यांची रिअल टाईम नोंद होणार आहे.

फ्लडिंग पॉइंट्सवर एक खांब उभारण्यात येणार असून त्यावर खोलगट वाटी ठेवण्यात येणार असून वाटीत जमा होणाऱ्या पावसाच्या पाण्यावरुन किती पाऊस पडला, किती वाजता पाणी ओसरले याची प्रत्येक अपडेट मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाला मिळणार आहे. या नवीन तंत्रज्ञानामुळे फ्लडिंग पॉइंट्स परिसरातील परिस्थीती चे अपडेट मुंबईकरांना मिळतील, अशी माहिती पर्जन्य वाहिनी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

मुंबईत किती पाऊस पडला याची नोंद ठेवण्यासाठी मुंबई महापालिकेची चेंबूर व माटुंगा येथे केंद्र आहेत. दोन केंद्र असल्याने मुंबईत अन्य कुठल्या भागात विशेष करुन फ्लडिंग परिसरात किती पाऊस पडला, परिसरातील पावसाच्या पाण्याचा किती वाजता निचरा झाला, याची माहिती वेळेत उपलब्ध होत नाही.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in