मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन; जन्मठेपेलाही स्थगिती, डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणी CBI ला धक्का

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात दोषी ठरलेला मुख्य आरोपी सचिन अंदुरे याला मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला.
मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन; जन्मठेपेलाही स्थगिती, डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणी CBI ला धक्का
मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन; जन्मठेपेलाही स्थगिती, डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणी CBI ला धक्का
Published on

मुंबई : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात दोषी ठरलेला मुख्य आरोपी सचिन अंदुरे याला मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला. न्यायमूर्ती सारंग व्ही. कोतवाल आणि न्यायमूर्ती रणजीतसिंह राजा भोसले यांच्या खंडपीठाने अंदुरे यांचा याचे अपील सुनावणीसाठी दाखल करून घेताना जामीन मंजूर केला. तसेच मुख्य अपील प्रलंबित असेपर्यंत जन्मठेपेच्या शिक्षेला स्थगिती दिली.

पुणे न्यायालयाच्या या निर्णया विरोधात आरोपी सचिन अंदुरे याने हायकोर्टात अपील दाखल करताना जामिनासाठी अर्ज केला होता. या अपिलावर न्यायमूर्ती सारंग व्ही. कोतवाल आणि न्यायमूर्ती रणजीतसिंह राजा भोसले यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी खंडपीठाने अंदुरेला जामीन अर्ज मंजूर करताना पुराव्यांमधील अनेक त्रुटींवर बोट ठेवले.

मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन; जन्मठेपेलाही स्थगिती, डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणी CBI ला धक्का
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण : मुख्य आरोपी सचिन अंदूरेला जामीन; जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती, HC चा मोठा निर्णय

प्रत्यक्षात घटनेच्यावेळी उपस्थित असल्याचा दावा करणाऱ्या दोन प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी घटनेनंतर सुमारे आठ ते नऊ वर्षांनी पहिल्यांदाच न्यायालयात आरोपीची ओळख पटवली. शिवाय, सीबीआयने या साक्षीदारांना दाखवलेल्या छायाचित्रांमध्ये अंदुरेची ओळख पटलेली नव्हती. तसेच, अंदुरेने एका साक्षीदारासमोर गुन्ह्याची कबुली दिल्याचा दावा    सीबीआयने केला होता; मात्र ही कबुली घटनेनंतर तब्बल पाच वर्षांनी आणि अंदुरेच्या अटकेनंतर समोर आली होती, ज्याला कोणताही ठोस पाठपुरावा किंवा स्वतंत्र पुरावा नव्हता, असे न्यायालयाला आढळले.

तपास यंत्रणेकडून योग्य दिशेने तपास नाही

तसेच , बॅलिस्टिक तज्ज्ञांच्या अहवालानुसार    मुंब्रा पोलिसांकडून जप्त केलेल्या पिस्तूल आणि गोळ्यांचा मेळ डॉ. दाभोलकरांच्या शरीरातून मिळालेल्या गोळ्यांशी बसला होता. मात्र, तपास यंत्रणेने या दिशेने पुढे कोणताही तपास केला नाही अथवा त्याबद्दल न्यायालयात स्पष्टीकरण दिले नाही, याकडेही उच्च न्यायालयाने लक्ष वेधले.     

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in