५३व्या वाढदिवसानिमित्त मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचे चाहत्यांसोबत खास सेलिब्रेशन; पाहा VIDEO

Sachin Tendulkar Celebrates 53rd Birthday : मुंबईतील निवासस्थानाबाहेर मोठ्या संख्येने चाहते पहाटेपासूनच जमले होते. टाळ्यांचा कडकडाट, घोषणाबाजी आणि 'हॅपी बर्थडे'च्या जल्लोषात परिसर उत्साहाने दुमदुमून गेला होता.
५३व्या वाढदिवसानिमित्त मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचे चाहत्यांसोबत खास सेलिब्रेशन; पाहा VIDEO
५३व्या वाढदिवसानिमित्त मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचे चाहत्यांसोबत खास सेलिब्रेशन; पाहा VIDEO
Published on

क्रिकेटचे दिग्गज सचिन तेंडुलकर यांनी आपल्या ५३व्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांसोबत भावनिक आणि अविस्मरणीय क्षण अनुभवले. वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर मोठ्या संख्येने चाहते पहाटेपासूनच जमले होते. टाळ्यांचा कडकडाट, घोषणाबाजी आणि 'हॅपी बर्थडे'च्या जल्लोषात परिसर उत्साहाने दुमदुमून गेला होता.

चाहत्यांसोबत साधा पण भावनिक उत्सव

घरासमोर जमलेल्या चाहत्यांच्या जल्लोषात सचिन तेंडुलकर बाहेर आले. टाळ्यांचा कडकडाट आणि शुभेच्छांच्या वातावरणात त्यांनी केक कापून वाढदिवस साजरा केला. चाहत्यांशी संवाद साधत, कृतज्ञता व्यक्त करत त्यांनी त्यांच्या प्रेमाला प्रतिसाद दिला.

निवृत्तीनंतरही लोकप्रियता कायम

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही सचिन तेंडुलकर यांच्यावरील चाहत्यांचे प्रेम अजूनही कायम आहे. क्रिकेट इतिहासातील महान खेळाडूंमध्ये त्यांची गणना केली जाते. दरवर्षीप्रमाणे यंदाही सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून त्यांच्या कारकिर्दीतील संस्मरणीय क्षण आणि विक्रम पुन्हा चर्चेत आले आहेत.

चाहत्यांशी नाते कायम

घरासमोर झालेल्या साध्या केक-कटिंग कार्यक्रमातून सचिन आणि चाहत्यांमधील जिव्हाळ्याचे नाते पुन्हा अधोरेखित झाले. क्रिकेटप्रेमींसाठी ते आजही प्रेरणास्थान मानले जातात.

सचिनची तेंडुलकर यांची कारकीर्द

  • आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६६४ सामने

  • एकूण ३४,३५७ धावा

  • १०० शतकांचा अद्वितीय विक्रम

  • २०११ च्या विश्वचषक विजेत्या संघातील महत्त्वाचा खेळाडू

'मास्टर ब्लास्टर' आणि 'क्रिकेटचा देव' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकर यांनी आपल्या कामगिरीने क्रिकेट इतिहासात अढळ स्थान निर्माण केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in