छत्रपती संभाजीराजेंनी जितेंद्र आव्हाडांना सुनावले खडे बोल; म्हणाले, '...याचे परिणाम भोगावे लागतील'

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानावर आता खासदार संभाजीराजे आक्रमक
छत्रपती संभाजीराजेंनी जितेंद्र आव्हाडांना सुनावले खडे बोल; म्हणाले, '...याचे परिणाम भोगावे लागतील'
Published on

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केले होते. यावरून आता माजी खासदार संभाजीराजे आक्रमक झाले असून त्यांना खडे बोल सुनावले आहेत. "चर्चेत राहण्यासाठी बेताल विधाने करणे, हे चांगले नाही. याचे परिणाम भोगावे लागतील." असा इशारा संभाजीराजेंनी दिला आहे.

हेही वाचा:

Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाडांचे छत्रपती शिवरायांबद्दल केलेल्या विधानावर वाद; भाजप - राष्ट्रवादी कार्यकर्ते आमने सामने

जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या विधानांनंतर राज्यभर त्यांच्याविरोधात आंदोलने झाली. भाजपने त्यांनी केलेल्या विधानावर आक्षेप घेत जाहीर निषेध केला. यानंतर आता माजी खासदार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती संभाजीराजेंनी यावर आक्षेप घेतला आहे.

त्यांनी ट्विट केले की, "जितेंद्र आव्हाड एका विशिष्ट कंपूत वाढलेले आहेत. महाराष्ट्र त्यांना गांभीर्याने घेत नाही आणि घेणारही नाही. मतांसाठी, चर्चेत राहण्यासाठी बेताल वक्तव्य करणे बरे नव्हे. याचे परिणाम भोगावे लागतील." असे म्हणत त्यांच्यावर निशाणा साधला.

logo
marathi.freepressjournal.in