"आज रात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार...." ; संजय राऊतांना धमकी, बंगल्याच्या सुरक्षेत वाढ, बॉम्बशोधक पथक दाखल

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना बॉम्बस्फोटाने उडवून देण्याची धमकी आली असून मुंबई पोलीस व बॉम्बशोधक पथक याचा तपास करत आहे.
 "आज रात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार...." ; संजय राऊतांना धमकी, घराबाहेरील सुरक्षेत वाढ, बॉम्बशोधक पथक दाखल
"आज रात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार...." ; संजय राऊतांना धमकी, घराबाहेरील सुरक्षेत वाढ, बॉम्बशोधक पथक दाखल
Published on

एकीकडे राज्यात निवडणुकीची धामधूम सुरू आहे तर दुसरीकडे नववर्षाच्या स्वागताची तयारी. असे असताना मुंबईत एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांच्या घराबाहेर बुधवारी (दि. ३१) मुंबई पोलिसांसह बॉम्बशोधक पथक दाखल झाले. त्यांच्या बंगल्याबाहेर उभ्या असलेल्या एका कारवर ‘आज रात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार’ असा धमकीचा मजकूर लिहिलेला आढळून आला आहे.

नाहूर येथील संजय राऊत यांच्या ‘मैत्री’ बंगल्याबाहेर एक कार होती. त्या कारच्या काचेवर हा मजकूर लिहिला होता. या घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलीस आणि बॉम्बशोधक पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित कारसह संपूर्ण परिसराची कसून तपासणी करण्यात येत आहे. राऊत यांच्या बंगल्याची

सुरक्षाही वाढवण्यात आली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून विशेष दक्षता घेतली जात आहे.

दरम्यान, बंगल्याबाहेर उभी असलेली कार नेमकी कोणाची आहे, ती तिथे कधीपासून उभी आहे, याचा तपास सुरू आहे. तसेच कारवरील धमकीचा मजकूर कोणी आणि कधी लिहिला, हे शोधण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in