Mumbai : खासदार संजय राऊत यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड; तातडीने रुग्णालयात दाखल

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना तातडीने भांडुप येथील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Mumbai : खासदार संजय राऊत यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड; तातडीने रुग्णालयात दाखल
Published on

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना तातडीने भांडुप येथील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या रक्त तपासण्या करण्यात आल्या होत्या. आज (दि. १३) सकाळी अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले.

प्राथमिक माहितीनुसार, राऊत यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. डॉक्टरांकडून आवश्यक वैद्यकीय तपासण्या सुरू आहेत. त्यांना काही दिवस आराम करण्याचा सल्ला देण्यात आल्याचे समजते.

पत्रकार परिषदेत महत्त्वाचे विधान

संजय राऊत यांनी आज सकाळी नेहमीप्रमाणे पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अनेक राजकीय मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिल्या आणि विशेषत: राज ठाकरे यांच्या महाविकास आघाडीत प्रवेशाच्या शक्यतेबाबत महत्त्वपूर्ण विधान केलं.

राऊत म्हणाले, "राज ठाकरे यांनाही वाटतं की महाविकास आघाडीत काँग्रेसचा सहभाग आवश्यक आहे. सर्व घटक एकत्र आले, तर महाराष्ट्रात पर्यायी शक्ती निर्माण होऊ शकते." या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाच्या शक्यता चर्चेत आल्या. परंतु, पत्रकार परिषदेनंतर राऊतांना अचानक अस्वस्थ वाटल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in