"...त्यांचा पक्ष एवढाही मोठा नाही" राज ठाकरेंच्या टीकेवर संजय राऊतांची प्रतिक्रिया

काल मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त राज ठाकरे यांनी विरोधकांना इशारा देताना, 'माझ्या नादाला लागू नका,' असा इशारा अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंना दिला होता
"...त्यांचा पक्ष एवढाही मोठा नाही" राज ठाकरेंच्या टीकेवर संजय राऊतांची प्रतिक्रिया

काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापनदिनानिमित्त राज ठाकरे यांनी विरोधकांवर टीका करताना इशारा दिला होता. उद्धव ठाकरेंना टोला लागवताना ते म्हणाले होते की, "हिंदुत्ववादी पक्षाच्या कृतीत हिंदुत्व दिसत नाही. त्यांनी मनसेच्या वाट्याला गेल्याने त्यांचे मुख्यमंत्रीपद गेले, असा टोला लगावला होता. यावर आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिले असून ते म्हणाले की, "कोणीही कोणाच्या वाट्याला गेलेले नाही. त्यांच्या वाट्याला जाण्याइतपत त्यांचा पक्ष मोठा नाही," अशी टीका यावेळी त्यांनी केली.

हेही वाचा

माझ्या वाटेला जाऊ नका, जे माझ्या वाटेला गेले त्यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले- राज ठाकरे

खासदार संजय राऊत म्हणाले की, "महाराष्ट्रातील शिवसेनेचे सरकार कसे गेले? हे संपूर्ण जगाला माहीत आहे. त्यांना जर माहीत नसेल तर अजून त्यांच्या पक्षाची वाढ व्यवस्थित होणे आधी गरजेचे आहे. महाराष्ट्रामधील सरकार हे फक्त ईडी, सीबीआय या यंत्रणांचा गैरवापर करुन पाडण्यात आले होते. त्यासोबत जोडीला खोकेदेखील होते. ईडी काय आहे, हे मनसे प्रमुखांना वेगळे सांगायला नको. त्यांनी त्याचा चांगलाच अनुभव घेतला आहे. हा अनुभव आमच्यासारख्या नेत्यांनी घेऊनसुध्दा आमच्या तोफा आणि पक्षाचे काम सुरुच आहे. शिवसेनेने कधीच हिंदुत्व सोडलेले नाही," असा टोला त्यांनी लगावला.

logo
marathi.freepressjournal.in