टाटा मुंबई मॅरेथॉनसाठी धावणार देशभरातील धावपटू; कोस्टल रोडवरून धावण्याचा नवा अनुभव, जाणून घ्या सर्व अपडेट

देशातील सर्वात मोठ्या रोड-रनिंग इव्हेंटपैकी एक असलेल्या या मॅरेथॉनच्या २१व्या पर्वाची संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे.
टाटा मुंबई मॅरेथॉनसाठी धावणार देशभरातील धावपटू; कोस्टल रोडवरून धावण्याचा नवा अनुभव, जाणून घ्या सर्व अपडेट
Published on

टाटा मुंबई मॅरेथॉन २०२६ रविवारी, (दि.१८) ला आयोजित करण्यात आली असून, भारतासह जगभरातील हजारो धावपटू या प्रतिष्ठित स्पर्धेत सहभागी होणार आहेत. देशातील सर्वात मोठ्या रोड-रनिंग इव्हेंटपैकी एक असलेल्या या मॅरेथॉनच्या २१व्या पर्वाची संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे.

मॅरेथॉनचे वेळापत्रक

धावपटूंना धावताना ढगाळ वातावरण आणि कमी तापमानाचा लाभ मिळावा यासाठी पहाटे लवकर सुरुवात करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

  • फुल मॅरेथॉन : सकाळी ५:००

  • हाफ मॅरेथॉन : सकाळी ५:००

  • १० किमी वेळेनुसार धावणे : सकाळी ६:००

  • इतर इव्हेंट्स : ड्रीम रन, सीनियर सिटिझन्स रन, डिसॅबिलिटी रन यांची सुरुवात सकाळपासून टप्प्याटप्प्याने होईल.

कोणत्या मार्गाने धावणार धावपटू

या वर्षी प्रथमच मॅरेथॉनचा मार्ग कोस्टल रोडवरून जाणार असून, धावपटूंना अरबी समुद्राचं अप्रतिम दृश्य अनुभवता येईल. मॅरेथॉनची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथून होईल आणि या मार्गात मरीन ड्राईव्ह, वरळी सी-फेस, बांद्रा-वरळी सी-लिंकसह मुंबईतील अनेक प्रतीकात्मक ठिकाणांचा समावेश आहे. धावपटूंच्या सुरक्षेसाठी मार्गावरील प्रमुख रस्ते पहाटेपासून वाहतुकीसाठी बंद ठेवले जाणार आहेत.

मॅरेथॉनमध्ये किती धावपटूंचा समावेश

या वर्षीच्या मॅरेथॉनमध्ये तब्बल ६९,००० पेक्षा अधिक धावपटू सहभागी होत असून, ही आतापर्यंतची सर्वाधिक नोंद आहे. यात मैदानावर धावणारे तसेच व्हर्च्युअल धावपटूंंचाही समावेश आहे.

लाईव्ह कव्हरेज

Sony Sports नेटवर्कवर मॅरेथॉनचे थेट प्रक्षेपण असणार आहे तर SonyLIV अॅपवर लाईव्ह स्ट्रिमिंग करण्यात येणार आहे. संपूर्ण देशातील नागरिकांना ही मॅरेथॉन पाहता येणार आहेत.

धावपटूंसाठी विशेष सोय

मुंबईतील परिवहन सेवांनीही धावपटूंना मदत करण्यासाठी विशेष व्यवस्था केली आहे.
पहाटेपासून मेट्रोच्या गाड्या अतिरिक्त फेऱ्यांमध्ये धावणार असून, मॅरेथॉन मार्गावरील महत्त्वाच्या ठिकाणी पोहोचणे अधिक सोयीस्कर होणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in