Mumbai : वसई न्यायालयातील विशेष सरकारी वकिलाला २५ हजारांची लाच घेताना अटक; एसीबीने रंगेहात पकडले

ठाणे अँटी करप्शन युनिट मार्फत वसई कोर्ट येथील विशेष सहाय्यक सरकारी वकील भूपेश पुरंदरे यांना मुंबई उच्च न्यायालयात प्रॅक्टिस करणाऱ्या ॲड. निलम पांचाळ यांच्या अशिलाकडून रुपये २५ हजारांची लाच स्वीकारताना वसई न्यायालयातील त्यांच्या कक्षात रंगेहात पकडले असून, पुरंदरे यांना अटक करण्यात आली आहे.
Mumbai : वसई न्यायालयातील विशेष सरकारी वकिलाला २५ हजारांची लाच घेताना अटक; एसीबीने रंगेहात पकडले
Mumbai : वसई न्यायालयातील विशेष सरकारी वकिलाला २५ हजारांची लाच घेताना अटक; एसीबीने रंगेहात पकडले
Published on

वसई : ठाणे अँटी करप्शन युनिट मार्फत वसई कोर्ट येथील विशेष सहाय्यक सरकारी वकील भूपेश पुरंदरे यांना मुंबई उच्च न्यायालयात प्रॅक्टिस करणाऱ्या ॲड. निलम पांचाळ यांच्या अशिलाकडून रुपये २५ हजारांची लाच स्वीकारताना वसई न्यायालयातील त्यांच्या कक्षात रंगेहात पकडले असून, पुरंदरे यांना अटक करण्यात आली आहे. सरकारी वकिलास न्यायालयातील कक्षातच लाच घेताना रंगेहात अटक होणे, ही वसई न्यायालयातील पहिलीच घटना आहे.

ॲड. निलम पांचाळ यांच्या अशिलावर मणिपूर पोलीस ठाणे येथे दाखल केलेल्या गुन्ह्या मधील प्रॉपर्टी सोडविण्यासाठी लागणाऱ्या 'रिटर्न ऑफ प्रॉपर्टी' बाबतच्या 'से' करिता मा. प्रथम वर्ग सह दिवाणी न्यायालय, कनिष्ट स्तर वसई येथे अर्ज दाखल केला होता. दि. २० मे रोजी नमूद विशेष सहाय्यक सरकारी वकील पुरंदरे यांनी त्यावर आपला अभिप्राय देण्याकरिता या तक्रारदार, तथा वकील पांचाळ यांच्या अशिलाकडून २५ हजारांची लाच रक्कम मिळावी म्हणून मागणी केली होती.

Mumbai : वसई न्यायालयातील विशेष सरकारी वकिलाला २५ हजारांची लाच घेताना अटक; एसीबीने रंगेहात पकडले
Navi Mumbai : लाचप्रकरणी सिडकोचा अप्पर जिल्हाधिकारी अटकेत; ACB ने रंगेहात पकडले

त्यानंतर ॲड. पांचाळ यांनी विशेष सहाय्यक सरकारी वकील पुरंदरे यांच्याविरोधात ठाणे अँटी करप्शन ब्युरोकडे रीतसर तक्रार केली होती. त्यानंतर अँटी करप्शनतर्फे सापळा रचून वसई न्यायालयातील कारवाई दरम्यान पैसे स्वीकारताना पुरंदरे यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in