टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण : आणखी एका आरोपीला इंदूरमधून अटक

अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर झालेल्या गोळीबारप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने ११व्या आरोपीला अटक केली आहे. प्रांजल थकरान (वय २२) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याला इंदूर येथून ताब्यात घेण्यात आले. इंदूर पोलिसांच्या मदतीने संयुक्त कारवाई करत ही अटक करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी शनिवारी दिली.
टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण : आणखी एका आरोपीला इंदूरमधून अटक
Published on: 

पूनम अपराज/मुंबई

अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर झालेल्या गोळीबारप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने ११व्या आरोपीला अटक केली आहे. प्रांजल थकरान (वय २२) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याला इंदूर येथून ताब्यात घेण्यात आले. इंदूर पोलिसांच्या मदतीने संयुक्त कारवाई करत ही अटक करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी शनिवारी दिली. प्रांजल हा मूळचा हरयाणातील सोनीपत येथील रहिवासी आहे.

या प्रकरणात शस्त्रपुरवठा करण्यात प्रांजलचा कथित सहभाग असल्याचे तपासात समोर आले आहे. इंदूरमधील परदेशीपुरा परिसरातील एका रुग्णालयातून त्याला अटक करण्यात आली. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून तो या रुग्णालयात येत होता. त्याचा भाऊ पक्षाघाताने त्रस्त असून, त्याच्या देखभालीसाठी प्रांजल नियमितपणे रुग्णालयात जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

प्रांजलच्या भावाला उपचारांसाठी दिल्लीतील रुग्णालयातून इंदूरमधील रुग्णालयात पाठवण्यात आले होते. त्यानंतर प्रांजल भावाच्या उपचारांसाठी आणि देखभालीसाठी तेथे नियमित जात होता. गोळीबारप्रकरणाच्या तपासादरम्यान गुन्हे शाखेने त्याचा माग काढून रुग्णालयातून त्याला अटक केली.

दरम्यान, या प्रकरणाच्या तपासात आणखी महत्त्वाची कारवाई करत मुंबई गुन्हे शाखेने गुजरातमधील सूरत येथून दोन पिस्तुले आणि १० जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. जप्त करण्यात आलेल्या शस्त्रांमध्ये झिगाना पिस्तूल आणि देशी बनावटीच्या पिस्तुलाचा समावेश आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शस्त्रे टाकून दिल्याचे कथित ठिकाण शोधण्यासाठी गुन्हे शाखेचे पथक अटक करण्यात आलेल्या गोळीबार करणाऱ्या आरोपींना सूरतमधील एका निर्जन ठिकाणी घेऊन गेले होते. तेथे सुमारे एक तास शोधमोहीम राबवल्यानंतर पोलिसांना ही शस्त्रे आणि काडतुसे सापडली.

या गोळीबारप्रकरणातील शस्त्रपुरवठ्याची साखळी उघड करणे आणि आरोपींची भूमिका निश्चित करण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू आहे. दरम्यान, प्रांजलला इंदूर न्यायालयाने तीन दिवसांची ट्रान्झिट रिमांड मंजूर केली. त्यानंतर मुंबई पोलीस त्याला घेऊन मुंबईच्या दिशेने रवाना झाले.

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण : आणखी एका आरोपीला इंदूरमधून अटक
Tiger Shroff Firing : हल्लेखोरांची 'झंगी', 'सिग्नल' ॲप्सद्वारे बातचीत

मीडियाच्या माध्यमातून हँडलर्स देत होते मारेकऱ्यांना क्षणाक्षणाची माहिती

अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर १८ ऑक्टोबरच्या संध्याकाळी गोळीबार करून पसार झालेल्या तीन मुख्य मारेकऱ्यांना पोलीस तपासाची प्रत्येक माहिती मीडियाच्या माध्यमातून मिळत होती. त्यांचे 'हँडलर्स' टीव्हीवरील बातम्यांवर लक्ष ठेवून मारेकऱ्यांना रिअल-टाइम अपडेट्स देत होते, ज्यामुळे त्यांना आपले पळून जाण्याचे मार्ग वेळेत बदलणे शक्य झाले, असा दावा पोलीस सूत्रांनी शनिवारी केला.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in