मराठी अभिनेता तुषार घाडीगावकरने संपवलं आयुष्य; नैराश्यातून आत्महत्या

मराठी मालिकांमध्ये आणि छोट्या पडद्यावर विविध भूमिका साकारलेला अभिनेता तुषार घाडीगावकर याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून काम मिळत नसल्याने नैराश्यातून तुषारने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समजते. भांडुपमधील राहत्या घरात त्याने आपले जीवन संपवले. त्याच्या आत्महत्येमुळे मराठी कलाविश्वात एकच खळबळ उडाली आहे.
मराठी अभिनेता तुषार घाडीगावकरने संपवलं आयुष्य; नैराश्यातून आत्महत्या
Published on

मराठी मालिकांमध्ये आणि छोट्या पडद्यावर विविध भूमिका साकारलेला अभिनेता तुषार घाडीगावकर याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून काम मिळत नसल्याने नैराश्यातून तुषारने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समजते. भांडुपमधील राहत्या घरात त्याने आपले जीवन संपवले. त्याच्या आत्महत्येमुळे मराठी कलाविश्वात एकच खळबळ उडाली आहे.

तुषार घाडीगावकर हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीचा रहिवासी होता. त्याने रुपारेल कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना नाट्य विभागात अभिनयाची सुरुवात केली. कॉलेजमध्ये त्याला ‘घाड्या’ या टोपणनावाने ओळखले जायचे.

त्याने ‘लवंगी मिरची’, ‘मन कस्तुरी रे’, ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. त्याच्या भूमिका लहान असल्या तरी प्रेक्षकांच्या लक्षात राहणाऱ्या होत्या. त्याशिवाय ‘भाऊबळी’, ‘उनाड’, ‘झोंबिवली’ यासारख्या मराठी चित्रपटांमधूनही त्याने आपल्या अभिनयाची छाप पाडली होती. अलीकडेच तो ‘सखा माझा पांडुरंग’ या मालिकेत झळकला होता.

वैयक्तिक आयुष्यातील निराशा -

तुषारच्या आत्महत्येमागील प्राथमिक कारण काम मिळत नसल्याचे आणि मानसिक तणाव असल्याचे सांगितले जात आहे. अभिनयाच्या क्षेत्रातील अनिश्चितता, आर्थिक ताणतणाव आणि अपेक्षा-प्रत्यक्ष वास्तवातील दरी यामुळे त्याला नैराश्य आले होते, अशी माहिती समोर आली आहे.

सहकलाकारांकडून श्रद्धांजली -

तुषारच्या निधनाची बातमी समजताच मराठी मनोरंजनसृष्टीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अभिनेता अंकुर वाढवे याने एक भावनिक फेसबुक पोस्ट करत लिहिले, "मित्रा का? कामं येतात जातात. आपण मार्ग काढले पाहिजे. आत्महत्या हा मार्ग नाही." त्याचप्रमाणे ज्येष्ठ अभिनेता वैभव मांगले यांनीही सामाजिक माध्यमातून व्यक्त होत म्हटले की, "माणसं आतून खूप तुटलेली असू शकतात... आणि अशी माणसं शेवटी एकटी पडतात."

logo
marathi.freepressjournal.in