Bhayandar : दोन बांगलादेशी महिलांना दोन वर्षांची शिक्षा; प्रत्येकी १० हजारांचा दंड

मीरारोड परिसरात बेकायदेशीररीत्या वास्तव्यास असलेल्या दोन बांगलादेशी महिलांना ठाणे अपर सत्र न्यायालयाने प्रत्येकी दोन वर्षांच्या कारावासाची व १० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे.
Satara : महाबळेश्वरमध्ये पर्यटकाची हत्या; चारही आरोपींना अटक
Satara : महाबळेश्वरमध्ये पर्यटकाची हत्या; चारही आरोपींना अटक
Published on

भाईंंदर : मीरारोड परिसरात बेकायदेशीररीत्या वास्तव्यास असलेल्या दोन बांगलादेशी महिलांना ठाणे अपर सत्र न्यायालयाने प्रत्येकी दोन वर्षांच्या कारावासाची व १० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. तसेच शिक्षा पूर्ण झाल्यानंतर नियमानुसार त्यांना बांगलादेशात परत पाठविण्याचे आदेशही न्यायालयाने संबंधित प्रशासकीय यंत्रणांना दिले आहेत.

अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने ३ डिसेंबर २०२४ रोजी मीरारोड पूर्वेतील रामदेव पार्क परिसरात सापळा रचून शहनाज बिलाल सद्दर (४३) आणि हसीना जब्बर खान (४५) या दोघींना ताब्यात घेतले होते. ही कारवाई पोलीस निरीक्षक समीर अहिरराव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली होती. प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील यांनी केला.

चौकशीदरम्यान दुभाष्याच्या मदतीने दोन्ही महिलांनी आपण बांगलादेशातील जशोर जिल्ह्यातील रहिवासी असून वर्षभरापासून मीरा-भाईंदर परिसरात राहत असल्याची कबुली दिली. पोलिसांनी पासपोर्ट, व्हिसा किंवा भारतात वास्तव्यासाठी आवश्यक असलेली वैध कागदपत्रे मागितली असता त्यांना कोणतेही दस्तावेज सादर करता आले नाहीत. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

सुनावणीदरम्यान आरोपींनी स्वेच्छेने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायाधीश वि. मोहिते यांनी दोघींना दोन वर्षांचा कारावास व प्रत्येकी १० हजार रुपयांचा दंड ठोठावला. तसेच ३ डिसेंबर २०२४ पासून न्यायालयीन कोठडीत घालविलेला कालावधी शिक्षेत समाविष्ट करण्याचे निर्देश देत, शिक्षा पूर्ण झाल्यानंतर दोघींना बांगलादेशात परत पाठविण्याची व्यवस्था करण्याचे आदेश दिले.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in