Mumbai : उद्धव ठाकरे यांच्याकडून एक्सपोर्ट-इम्पोर्ट लॉजिस्टिक्स कोर्सचा शुभारंभ; काय आहे खास? फी किती? जाणून घ्या

या कोर्सद्वारे तरुणांना कस्टम क्लिअरन्स, लॉजिस्टिक्स ऑपरेशन्स, वेअरहाऊसिंग, सप्लाय चेन मॅनेजमेंट या क्षेत्रांतील कौशल्ये शिकवली जाणार आहेत.
Mumbai : उद्धव ठाकरे यांच्याकडून एक्सपोर्ट-इम्पोर्ट लॉजिस्टिक्स कोर्सचा शुभारंभ; काय आहे खास? फी किती? जाणून घ्या
(Photo-X/@ShivSenaUBT_)
Published on

मुंबईत स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी ५ आठवड्यांचा एक्सपोर्ट-इम्पोर्ट लॉजिस्टिक्स कोर्स (Export-Import Logistics) सुरू केला. दादरमधील सेना भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत या कोर्सची घोषणा करण्यात आली.

हा उपक्रम दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सुरू करण्यात आला असून, स्थानिक युवकांना रोजगारक्षम बनवणे हा त्यामागील मुख्य उद्देश आहे.

कौशल्य विकासावर भर

उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, या कोर्सद्वारे तरुणांना कस्टम क्लिअरन्स, लॉजिस्टिक्स ऑपरेशन्स, वेअरहाऊसिंग, सप्लाय चेन मॅनेजमेंट या क्षेत्रांतील कौशल्ये शिकवली जाणार आहेत. यामुळे प्रशिक्षण घेतलेल्या युवकांना थेट रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हायला मदत होईल.

या कोर्सची पहिली बॅच ३० विद्यार्थ्यांची असून, कोर्सच्या प्रशिक्षणाला आजपासून (दि.२१ मार्च) सुरुवात झाली आहे.

कोर्सचे स्वरूप आणि कालावधी

हा एक्सपोर्ट-इम्पोर्ट लॉजिस्टिक्स कोर्स लोकल सेल्फ गव्हर्नमेंट कमिटी फेडरेशन आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फ्रेट फॉरवर्डर्स (FFFAI Education Wing) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे.

कोर्सची वैशिष्ट्ये :

  • कालावधी : ५ आठवडे (५ शनिवारी सत्रे)

  • ३० तासांचे वर्गमाध्यमातून प्रशिक्षण

  • २० दिवसांचे प्रत्यक्ष कंपनीत प्रशिक्षण (प्रॅक्टिकल अनुभव)

पात्रता आणि फी

  • किमान पात्रता : १२वी उत्तीर्ण

  • हा कोर्स शासनाच्या निकषांनुसार तयार करण्यात आला आहे.

  • कोर्स पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र दिले जाणार.

  • फी : ₹२,००० ते ₹३,००० दरम्यान

पुढील टप्प्यात प्रगत कोर्स

या कोर्सनंतर इच्छुकांसाठी इंटरमीडिएट स्तराचा कोर्सही सुरू करण्यात येणार आहे. यामुळे पदोन्नती किंवा सुपरवायझर स्तरावर जाण्याची संधी मिळू शकते.

आयोजकांकडून प्रशिक्षणाची हमी दिली जाणार असली तरी नोकरी टिकवणे आणि करिअरमध्ये प्रगती करणे ही जबाबदारी विद्यार्थ्यांचीच असेल, असेही स्पष्ट करण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in