उद्धव ठाकरे यांनी घेतली शरद पवारांची भेट; मविआतील मतभेदाबाबत झाली चर्चा?

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी सोमवारी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार) अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.
उद्धव ठाकरे यांनी घेतली शरद पवारांची भेट; मविआतील मतभेदाबाबत झाली चर्चा?
फोटो सौजन्य - आयएएनएस
Published on

मुंबई: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी सोमवारी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार) अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महाविकास आघाडीतील मतभेद उफाळून आल्याच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली.

ठाकरे यांनी दक्षिण मुंबईतील सिल्व्हर ओक येथील शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल एका तासाहून अधिक वेळ चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

महाविकास आघाडीच्या स्थापनेचे प्रमुख शिल्पकार असलेल्या पवार यांनी आघाडीत निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांनी नुकतेच म्हटले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर चर्चा करण्यासाठी आघाडीच्या तिन्ही घटक पक्षांची बैठक लवकरच बोलावली जाईल. शिवसेना ठाकरे पक्षाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढवण्याची घोषणा केली आहे. त्या पार्श्वभूमीवर या भेटीत मविआतील मतभेदाबाबत चर्चा झाल्याचे समजते.

logo
marathi.freepressjournal.in