व्हेपिंग धूम्रपानापेक्षा कमी धोकादायक; फ्रेंच आरोग्य संस्थेचा अहवाल

फ्रान्समधील फ्रेंच एजन्सी फॉर फूड, एन्व्हायर्नमेंटल अँड ऑक्युपेशनल सेफ्टी अँड हेल्थ (ANSES) ने प्रसिद्ध केलेल्या सविस्तर वैज्ञानिक अहवालात व्हेपिंग (ई-सिगारेट्स) हे पारंपरिक धूम्रपानापेक्षा तुलनेने कमी आरोग्यधोके निर्माण करते, असा निष्कर्ष नोंदवण्यात आला आहे. मात्र, ते पूर्णपणे सुरक्षित नाही, असेही अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
व्हेपिंग धूम्रपानापेक्षा कमी धोकादायक; फ्रेंच आरोग्य संस्थेचा अहवाल
व्हेपिंग धूम्रपानापेक्षा कमी धोकादायक; फ्रेंच आरोग्य संस्थेचा अहवाल
Published on

मुंबई : फ्रान्समधील फ्रेंच एजन्सी फॉर फूड, एन्व्हायर्नमेंटल अँड ऑक्युपेशनल सेफ्टी अँड हेल्थ (ANSES) ने प्रसिद्ध केलेल्या सविस्तर वैज्ञानिक अहवालात व्हेपिंग (ई-सिगारेट्स) हे पारंपरिक धूम्रपानापेक्षा तुलनेने कमी आरोग्यधोके निर्माण करते, असा निष्कर्ष नोंदवण्यात आला आहे. मात्र, ते पूर्णपणे सुरक्षित नाही, असेही अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. हा निष्कर्ष २,५०० हून अधिक वैज्ञानिक अभ्यासांच्या पुनरावलोकनावर आधारित आहे.

अहवालानुसार पारंपरिक सिगारेटमध्ये तंबाखू जाळण्याची प्रक्रिया होते, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात विषारी आणि कर्करोगजन्य रसायने तयार होतात. याउलट ई-सिगारेटमध्ये द्रव गरम करून एरोसोल तयार केला जातो, ज्यामध्ये हानिकारक पदार्थांचे प्रमाण तुलनेने कमी असते.

फ्रान्समधील आकडेवारीनुसार दररोज व्हेपिंग करणाऱ्यांचे प्रमाण ६.१ टक्के असून दररोज धूम्रपान करणाऱ्यांचे प्रमाण १८.२ टक्क्यांपर्यंत घसरले आहे. १९९० नंतरचे हे सर्वात कमी प्रमाण मानले जाते. यावरून व्हेपिंग हे प्रामुख्याने धूम्रपान करणाऱ्यांसाठी हानी कमी करण्याचे साधन म्हणून वापरले जात असल्याचे दिसून येते.

ऑक्सफर्ड विद्यापीठातील पुराव्यावर आधारित आरोग्यसेवा विभागातील व्याख्याता व वरिष्ठ संशोधक डॉ. जोनाथन लिव्हिंगस्टोन-बँक्स यांनी सांगितले की, आमच्या संशोधनात ई-सिगारेट्स लोकांना तंबाखूचे धूम्रपान सोडण्यास मदत करतात, याचे ठोस पुरावे मिळाले आहेत. जरी त्या पूर्णपणे सुरक्षित नसल्या तरी पारंपरिक सिगारेटपेक्षा खूपच सुरक्षित आहेत.

logo
marathi.freepressjournal.in