वसईच्या दांम्पत्यावर फिलीपिन्समध्ये काळाचा घाला; बाईकवरुन फिरताना ट्रकने उडवले

पर्यटनासाठी फिलीपिन्सला गेलेल्या पालघर जिल्ह्यातील वसईमधील एका दांम्पत्याचा दुर्दैवी अपघातात मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे.
वसईच्या दांम्पत्यावर फिलीपिन्समध्ये काळाचा घाला; बाईकवरुन फिरताना ट्रकने उडवले
Published on

पालघर : पर्यटनासाठी फिलीपिन्सला गेलेल्या पालघर जिल्ह्यातील वसईमधील एका दाम्पत्याचा दुर्दैवी अपघातात मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. स्थानिक चर्चच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी ही माहिती दिली. त्यांच्या पश्चात एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.

सविस्तर माहितीनुसार, ते वसईतील सँडोर परिसरात वास्तव्यास होते.जेराल्ड परेरा (५०) आणि त्यांची पत्नी प्रिया (४६) हे १० मे रोजी फिलीपिन्समधील सेबू प्रांतातील बाडियान या पर्यटनस्थळी भाड्याने घेतलेल्या दुचाकीवरून फिरत होते. दरम्यान, एका फिलीपिन्स नागरिकाने बेदरकारपणे टोयोटा हिलक्स ट्रकने ओव्हरटेक करताना त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेनंतर दोघेही रस्त्यालगतच्या सिमेंटच्या विद्युत खांबावर आदळले.

या भीषण अपघातात प्रिया यांचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या जेराल्ड यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला. परेरा दाम्पत्याचे मृतदेह भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू आहे.

logo
marathi.freepressjournal.in