चालत्या दुचाकीवरून पडून वसईत चिमुकलीचा मृत्यू; आईच्या हाताची पकड सैल झाल्याने झाला घात

चालत्या दुचाकीवरून आईच्या हातातून निसटून खाली पडल्याने एका वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना वसई येथे घडली. गंभीर जखमी झालेल्या मुलीचा मुंबईतील केईएम रुग्णालयात शुक्रवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला.
चालत्या दुचाकीवरून पडून वसईत चिमुकलीचा मृत्यू; आईच्या हाताची पकड सैल झाल्याने झाला घात
चालत्या दुचाकीवरून पडून वसईत चिमुकलीचा मृत्यू; आईच्या हाताची पकड सैल झाल्याने झाला घातप्रातिनिधिक छायाचित्र
Published on

वसई : चालत्या दुचाकीवरून आईच्या हातातून निसटून खाली पडल्याने एका वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना वसई येथे घडली. गंभीर जखमी झालेल्या मुलीचा मुंबईतील केईएम रुग्णालयात शुक्रवारी (दि.७) रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत मुलीचे नाव कृष्णा भावसार असे आहे. शुक्रवारी दुपारी १.१५ वाजण्याच्या सुमारास योगेश (३५) हे पत्नी आणि मुलीसह दुचाकीवरून तिवारी रोडने प्रवास करत होते. योगेश दुचाकी चालवत होते, तर त्यांची पत्नी मागे बसून मुलीला मांडीवर घेऊन होती.

प्रवासादरम्यान जोरदार वाऱ्यामुळे आईचे केस चेहऱ्यावर येत होते. त्यामुळे मुलीला कुशीत धरूनच तिने केस बांधण्याचा प्रयत्न केला. याचवेळी तिची मुलीवरील पकड सैल झाली आणि कृष्णा चालत्या दुचाकीवरून खाली रस्त्यावर पडली.

चालत्या दुचाकीवरून पडून वसईत चिमुकलीचा मृत्यू; आईच्या हाताची पकड सैल झाल्याने झाला घात
Pune : कौटुंबिक वादातून संतापजनक कृत्य! ९ महिन्यांच्या बाळाच्या तोंडात टाकलं फेव्ही क्विक

या दुर्घटनेत कृष्णाच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाली. तिला तातडीने मुंबईतील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी उपचाराचे प्रयत्न केले; मात्र शुक्रवारी रात्री तिचा मृत्यू झाला.

या घटनेमुळे भा‌वसार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी नायगाव पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू केला आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in