लाखो मुंबईकरांना दिलासा...म्हाडाच्या ५६ वसाहतींबाबत गृहनिर्माण मंत्र्यांची मोठी घोषणा

राज्यसरकारने घेतलेल्या निर्णयामुळे मुंबईतील लाखो रहिवाशांना दिलासा मिळाला आहे. या निर्णयामुळे तब्बल ३८४ कोटींचा...
लाखो मुंबईकरांना दिलासा...म्हाडाच्या ५६ वसाहतींबाबत गृहनिर्माण मंत्र्यांची मोठी घोषणा

म्हाडाच्या वसाहतींसंदर्भात राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. म्हाडाच्या ५६ वसाहतींना सेवा शुल्क माफ करण्याची घोषणा राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी केली आहे. राज्यसरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे मुंबईतील लाखो रहिवाशांना दिलासा मिळाला आहे. या निर्णयामुळे तब्बल ३८४ कोटींचा भुर्दंड माफ होणार आहे.

मुंबईतील सर्व आमदारांनी मिळून म्हाडाच्या ५६ वसाहतींना सेवा शुल्क माफ करावं, अशी मागणी केली होती. भाजप नेते आमदार प्रविण दरेकर यांनी देखील ही मागणी लावून धरली होती. यानंतर राज्यसरकारने याबाबतचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासोबत बैठक झाली. यात म्हाडाच्या ५६ वसाहतींना सेवा शुक्ल माफ करण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी दिली.

याापू्र्वी सेवा शुल्क वाढून ५० टक्के झाले होते. याचा सामान्य नागरिकाला मोठा बोजा सहन करावा लागत होता. त्यामुळे आम्ही बैठकीत सेवा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला घेतला असं ते म्हणाले. प्रविण दरेकर आणि आणि आशिष शेलार यांनी विधानसभेत याबाबतची मागणी केली होती, त्यामुळे आम्ही निर्णय घेतल्याचंही सावे म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in