निर्जन ठिकाणी नेले अन्... अल्पवयीन मुलीवर शाळकरी मुलांचा बलात्कार; व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी

मुलीचे आई-वडील घराबाहेर असताना आरोपींनी पीडितेला एका निर्जन ठिकाणी नेले आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या घटनेचा व्हिडिओ त्यांनी रेकॉर्डही केला... \
निर्जन ठिकाणी नेले अन्... अल्पवयीन मुलीवर शाळकरी मुलांचा बलात्कार; व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

कर्नाटकातील हुबळी येथे धक्कादायक घटना समोर आली आहे. एका १२ वर्षीय मुलीवर अवघ्या १३-१४ वर्षांच्या तीन मुलांनी सामूहिक बलात्कार केला. या प्रकरणातील तिन्ही आरोपी हे पीडित मुलीच्या घराजवळ राहतात. पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धडक देत त्यांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीचे आई-वडील घराबाहेर असताना आरोपींनी पीडितेला एका निर्जन ठिकाणी नेले आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या घटनेचा व्हिडिओ त्यांनी रेकॉर्डही केला, आणि तो व्हायरल करण्याची धमकीही दिली, असे पालकांनी तक्रारीत नमूद केले आहे.

तपासादरम्यान उघड झाले की, आरोपींपैकी दोघेजण शाळेत शिकत आहेत, तर तिसऱ्याने शाळा सोडली आहे. पोलिसांनी आरोपींचे मोबाईल जप्त करून सखोल तपास सुरू केला आहे. आरोपींविरुद्ध लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उत्तरप्रदेशातही अल्पवयीन मुलीची बलात्कार करून हत्या

याच आठवड्यात उत्तरप्रदेशातील बुलंदशहरमध्येही अशीच एक घटना समोर आली. एका ६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला. ही घटना २ जानेवारीच्या रात्री उशिरा घडली. पोलिसांनी सांगितले की, आरोपींनी आपली ओळख लपवण्यासाठी मुलीला छतावरून फेकले. तिला तातडीने सिकंदराबाद येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

या घटनेमुळे देशभरात बालसुरक्षा आणि अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचारांविषयी चिंता वाढली आहे. पोलिस तपासात या प्रकरणाचा संदर्भ घेऊन आरोपींच्या मानसिक व सामाजिक पार्श्वभूमीचा सखोल अभ्यास करून कायदेशीर कारवाई केली जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in