प्रयागराज : दाट धुक्यामुळे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला टेम्पोने धडक दिल्याने दोन जण ठार तर सहाजण जखमी झाले. प्रयागराज येथील महामार्गावर रविवारी पहाडे ही दुर्घटना झाल्याचे पूरमुफ्ती पोलीस स्टेशनचे एसएचओ अजित सिंह यांनी सांगितले. मृतांमध्ये मोहम्मद अमान (२४), मंजु देवी (५०) यांचा समावेश आहे. टेम्पोमध्ये ८ जण प्रवास करीत होते. यातील जखमींना नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले तेथे दोन जणांना मृत घोषित केले गेले.