आठ शहरातील सप्टेंबरपर्यंत ७.८५ लाख घरे विक्रीविना

कन्सलटंटने निवासी बाजारपेठांचे सर्वेक्षण केले असून त्यात मुख्यत: आठ शहरांचा समावेश आहे.
आठ शहरातील सप्टेंबरपर्यंत ७.८५ लाख घरे विक्रीविना

देशातील आठ शहरातील रिअल इस्टेट कंपन्यांकडील ७.८५ लाख घरे विक्रीविना पडून आहेत. तसेच सध्याच्या खरेदीचा वेग पाहता ही घरे विकण्यासाठी तब्बल ३२ महिन्यांचा कालावधी लागेल, असे प्रॉपटायगरने म्हटले आहे.

तथापि आम्रपाली, जेपी इन्फ्राटेक आणि युनिटेक आदी बडे बिल्डर आधीच दिवाळखोरीत गेल्याने त्याचा मोठा परिणाम , दिल्ली-एनसीआर निवासी बाजारपेठेवर झाला आहे. तेथील १ लाख घरे विक्रीविना पडून आहेत. ती विकण्यासाठी किमान ६२ महिने लागतील, असा अंदाज आहे.

कन्सलटंटने निवासी बाजारपेठांचे सर्वेक्षण केले असून त्यात मुख्यत: आठ शहरांचा समावेश आहे. या शहरांमध्ये अहमदाबाद, दिल्ली एनसीआर (दिल्ली, गुरुग्राम, नोएडा, ग्रेटर नोएडा, गाझियाबाद आणि फरिदाबाद ), चेन्नई, बंगळुरु, हैदराबाद, कोलकाता, मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन (बोईसर, डोंबिवली, मुंबई, माझगाव, पनवेल, ठाणे पश्चिम) आणि पुणे यांचा समावेशआहे.

आठ शहरांमध्ये जुलै ते सप्टेंबर २०२२ या कालावधीत ४९ टक्क्यांनी घरांची विक्री होऊन ८३,२२० युनिटस‌् विकली गेली. तर गेल्या वर्षी वरील कालवधीत ५५,९१० घरांची विक्री झाली होती, असेही या अहवालात म्हटले आहे.

logo
marathi.freepressjournal.in