मानवी तस्करीप्रकरणी केरळमधून एका परदेशी इसमास अटक

बांगलादेशमार्गे भारतात बेकायदेशीरपणे घुसलेला सौदी झाकीर हा गेल्या महिन्यात गुन्हा नोंदवल्यानंतर फेडरल एजन्सीने अटक केलेला ११ वा परदेशी होता
बेकायदा भारतीय पासपोर्टसह बांगलादेशी नागरिकाला मुंबई विमानतळावर अटक
बेकायदा भारतीय पासपोर्टसह बांगलादेशी नागरिकाला मुंबई विमानतळावर अटक
Published on

नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) मानवी तस्करीशी संबंधित एका प्रकरणात केरळमधून एका परदेशी नागरिकांना अटक केली, अशी माहिती एका अधिकाऱ्याने शुक्रवारी दिली.  

बांगलादेशमार्गे भारतात बेकायदेशीरपणे घुसलेला सौदी झाकीर हा गेल्या महिन्यात गुन्हा नोंदवल्यानंतर फेडरल एजन्सीने अटक केलेला ११ वा परदेशी होता. नोव्हेंबरमध्ये मानवी तस्करी रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी देशव्यापी कारवाईदरम्यान कर्नाटकातील त्याच्या घराची झडती घेतल्यापासून झाकीर फरार होता, केरळमधील कोची येथे त्याच्या लपलेल्या ठिकाणाचा शोध घेण्यात आला आणि गुरुवारी त्याला ताब्यात घेण्यात आले, असे अधिकाऱ्याने सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in