केरळमधील मलप्पुरममधील तनूर भागात 40 प्रवाशांना घेऊन जाणारी हाऊसबोट उलटली

बोटीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त लोक होते. यासोबतच बोटीवर सुरक्षा साधने नसल्याचेही बोलले जात आहे
केरळमधील मलप्पुरममधील तनूर भागात 40 प्रवाशांना घेऊन जाणारी हाऊसबोट उलटली
Published on

केरळमधील मलप्पुरममधील तनूर भागात रविवारी संध्याकाळी सुमारे 40 प्रवाशांना घेऊन जाणारी हाऊसबोट उलटून 21 जणांचा मृत्यू झाला. या अपघातातील मृतांची संख्या आता 21 वर पोहोचली असून सात जणांची प्रकृती चिंताजनक आहे. बोट उलटून नऊ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यानंतर आणखी 15 जणांचा मृत्यू झाला. रात्री उशिरा मृतांचा आकडा आणखी वाढला. अजूनही शोध सुरू आहे.

या बचाव कार्यात अनेक स्वयंसेवकही मदत करत आहेत. लोकांचा शोध घेणे, जीवंतांना वाचवणे आणि जखमींना रुग्णालयात नेणे ही प्रक्रिया रात्रभर सुरू होती.

क्षमतेपेक्षा जास्त बोट प्रवास

ही घटना सायंकाळी सातच्या सुमारास घडली. तनूर जिल्ह्याजवळील ओटीपुरम येथे वाहत्या नदीत बोट किनाऱ्यापासून 300 मीटर अंतरावर असताना हा अपघात झाला. मात्र अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, बोटीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त लोक होते. यासोबतच बोटीवर सुरक्षा साधने नसल्याचेही बोलले जात आहे. ज्या ठिकाणी हा अपघात झाला ते ठिकाण समुद्रापासून काही अंतरावर असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधानांकडून 2 लाखांची मदत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची भरपाई जाहीर करण्यात आली. यासोबतच त्यांनी ट्विट करून शोक व्यक्त केला. 

logo
marathi.freepressjournal.in