संपूर्ण देशच बनेल जंतरमंतर - अभिजीत दिपके

दिल्ली पोलिसांच्या ताब्यात असताना मला आणि माझ्या कुटुंबाला मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले, असा गंभीर आरोप 'सीजेपी'चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी सोमवारी केला.
संपूर्ण देशच बनेल जंतरमंतर - अभिजीत दिपके
संपूर्ण देशच बनेल जंतरमंतर - अभिजीत दिपके
Published on: 

नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांच्या ताब्यात असताना मला आणि माझ्या कुटुंबाला मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले, असा गंभीर आरोप 'सीजेपी'चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी सोमवारी केला. जंतरमंतर हे निदर्शनांचे अधिकृत ठिकाण रद्द करण्याच्या निर्णयावरून टीका करताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी आता "एक दिवस लोकशाहीच रद्द करतील आणि संपूर्ण देशच जंतरमंतर बनून जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

संपूर्ण देशच बनेल जंतरमंतर - अभिजीत दिपके
जंतर-मंतरवर आता आंदोलन करता येणार नाही; दिल्ली पोलिसांचा मोठा निर्णय, तीन नवी ठिकाणे निश्चित

जंतरमंतरची अधिकृत आंदोलनाचे ठिकाण म्हणून असलेली मान्यता रद्द करण्याचा सरकारचा निर्णय 'अस्वीकारार्ह' असून आम्ही हा मनमानी निर्णय मानत नाही, आता संपूर्ण देशच जंतरमंतर बनेल, असा इशारा दिपके यांनी दिला. दिल्ली पोलिसांनी एका अधिकृत आदेशाद्वारे जंतरमंतरची आंदोलनासाठी निर्धारित केलेली जागा रद्द करून निदर्शने व आंदोलने घेण्यासाठी तीन नवीन ठिकाणे जाहीर केली आहेत, त्यानंतर ही प्रतिक्रिया समोर आली आहे.

जंतरमंतर हे भारतातील जनतेचे आहे. गृह मंत्रालयाने भारतातील जनतेशी चर्चा केली होती का, कोणत्याही भागधारकांशी किंवा संघटनांशी सल्लामसलत केली गेली होती का, पंतप्रधानांवर टीका करताना ते म्हणाले की, लवकरच सरकार संपूर्ण भारतालाच लोकशाहीमुक्त घोषित करेल. ज्याप्रमाणे सरकार जंतर-मंतर रद्द करत आहेत, त्याचप्रमाणे पंतप्रधान लवकरच भारतातील लोकशाही संपवून टाकतील. हे त्या दिशेनेच टाकलेले एक पाऊल आहे, आम्ही हा मनमानी निर्णय स्वीकारत नाही, हा लोकांच्या आंदोलनाच्या आणि शांततापूर्ण एकत्र येण्याच्या मूलभूत हक्कांवर झालेला हल्ला आहे. आता संपूर्ण देशच जंतर-मंतर बनत आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in