पोलिस व्हॅनमधून पळ काढताना आरोपीचा मृत्यू

आरोपीला न्यू उस्मानपूर चौकीत घेऊन जात असतांना त्याने धावत्या व्हॅनमधून उडी मारुन पळ काढण्याचा प्रयत्न केला.
पोलिस व्हॅनमधून पळ काढताना आरोपीचा मृत्यू

नवी दिल्ली : येथे पोलिस व्हॅनमधून पळ काढतांना एका आंबटशौकिन आरोपीचा बुधवारी मृत्यू झाला. ४७ वर्षांच्या प्रमोद नावाच्या ग्रहस्थाला दिल्ली पोलिसांच्या गस्त घालणाऱ्या पथकाने महिलेचा विनयभंग करतांना पकडले होते.

आरोपीला न्यू उस्मानपूर चौकीत घेऊन जात असतांना त्याने धावत्या व्हॅनमधून उडी मारुन पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या प्रयत्नात तो जखमी झाला. पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला. तब्बल चार रुग्णालये फिरुन देखील कोणत्याही रुग्णालयात जागा मिळाली नाही. परिणामी उपचारा अभावी त्याचा मृत्यू झाला. पकडण्यात आले तेव्हा हा आरोपी दारुच्या नशेत झिंगला होता. त्यामुळे त्याला उलट्या देखील होत होत्या. असे असतांना गाडीतून उडी घेतल्याने तो जखमी झाला होता. त्याला लगेचच जेपीसी रुग्णालयात नेण्यात आले. नंतर जीटीबी रुग्णालयात पाठवण्यात आले. तेथे सीटी स्कॅनची सोय नसल्यामुळे त्याला एनजेपी रुग्णालयात धाडण्यात आले. तेथे आयसीयू उपलब्ध नव्हते. त्यामुळे त्याची परवड आरएमएल रुग्णालयात काढण्यात आली. त्या रुग्णालयाने प्रवेश नाकारला. तेव्हा त्याला पुन्हा जेपीसी रुग्णालयात आणण्यात आले. तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in