Gujarat : इमारतीच्या ३२व्या मजल्यावर क्रेनला लटकलेल्या अवस्थेत कामगाराचा मृतदेह; धक्कादायक घटनेचा VIDEO समोर

अहमदाबादच्या एसजी हायवेवरील बांधकामाधीन इमारतीच्या ३२व्या मजल्यावर क्रेनला २२ वर्षीय कामगाराचा मृतदेह आढळला.
Gujarat : इमारतीच्या ३२व्या मजल्यावर क्रेनला लटकलेल्या अवस्थेत कामगाराचा मृतदेह; धक्कादायक घटनेचा VIDEO समोर
Gujarat : इमारतीच्या ३२व्या मजल्यावर क्रेनला लटकलेल्या अवस्थेत कामगाराचा मृतदेह; धक्कादायक घटनेचा VIDEO समोर
Published on

गुजरातमधील अहमदाबादमध्ये बुधवारी (दि.१२) सकाळी बांधकाम सुरू असलेल्या उंच इमारतीत २२ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. एसजी हायवेवरील निरमा विद्यापीठासमोरील बांधकामस्थळी ३२व्या मजल्यावर क्रेनजवळ तरुणाचा मृतदेह आढळला. मृत तरुणाची ओळख प्रीतमसिंह अशी झाली असून तो मूळचा झारखंडचा रहिवासी होता. तो गेल्या काही वर्षांपासून या बांधकामस्थळी क्रेन ऑपरेटर म्हणून काम करत होता.

सकाळी कामगारांच्या लक्षात आली घटना

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही घटना मंगळवारी रात्री घडल्याचा प्राथमिक अंदाज असून प्रीतमसिंहने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. बुधवारी सकाळी सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास बांधकामस्थळी कामगार पोहोचले असता त्यांना क्रेनजवळ प्रीतमसिंहचा मृतदेह आढळला. त्यानंतर त्यांनी तातडीने साइट अभियंत्याला याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच सोला हायकोर्ट पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले. बचाव पथकाच्या मदतीने ३२व्या मजल्यावरून मृतदेह खाली आणण्यात आला. त्यानंतर तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

आत्महत्येचा प्राथमिक संशय

पोलिसांच्या प्राथमिक तपासात आत्महत्येचा संशय व्यक्त करण्यात आला असला तरी, त्याने हे टोकाचे पाऊल नेमके का उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनास्थळावरून आत्महत्येच्या कारणाबाबत ठोस माहिती मिळाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून इतर कामगार, अधिकारी तसेच प्रीतमसिंहच्या संपर्कातील व्यक्तींची चौकशी केली जात आहे. घटनेपूर्वी त्याचे कोणाशी बोलणे, वाद किंवा अन्य काही प्रकार झाला होता का, याचाही तपास पोलिस करत आहेत. शवविच्छेदन अहवाल आणि पोलिसांच्या पुढील तपासानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in