Air India Plane Crash Ahmedabad : एअर इंडिया अपघात; कारण अनिश्चित

एअर इंडियाच्या बोईंग ७८७ ड्रीमलाइनर विमानाला अहमदाबाद येथून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच झालेल्या अपघाताला शुक्रवारी एक वर्ष पूर्ण झाले आहे.
Air India Plane Crash Ahmedabad : एअर इंडिया अपघात; कारण अनिश्चित
Air India Plane Crash Ahmedabad : एअर इंडिया अपघात; कारण अनिश्चित
Published on

नवी दिल्ली: एअर इंडियाच्या बोईंग ७८७ ड्रीमलाइनर विमानाला अहमदाबाद येथून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच झालेल्या अपघाताला शुक्रवारी एक वर्ष पूर्ण झाले आहे. या अपघाताला वर्ष पूर्ण झाले तरी, बळी पडलेल्यांचे कुटुंबीय अद्यापही विमान नेमके कशामुळे कोसळले याचे स्पष्टीकरण आणि या प्रकरणाचा तपास अंतिम टप्प्यात येण्याची वाट पाहत आहेत.

या अपघाताच्या पहिल्या वर्धापनदिनापर्यंत भारताच्या ‘अॅक्रॉफ्ट अ‍ॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो’ने (एएआयबी) आपला अंतिम अहवाल सादर केलेला नाही. तपास अधिकाऱ्यांकडून अपघाताच्या पहिल्या वर्धापनदिनापर्यंत हा अहवाल पूर्ण होण्याची अपेक्षा होती.

त्याऐवजी, तपास यंत्रणा अजूनही विमानाची ‘जीई एरोस्पेस’ इंजिने आणि त्याच्याशी संबंधित नियंत्रण यंत्रणेच्या महत्त्वपूर्ण पुराव्यांची तपासणी करत असल्याने या तपासाला विलंब झाला आहे.

Air India Plane Crash Ahmedabad : एअर इंडिया अपघात; कारण अनिश्चित
सर्वात दुःखदायक प्रसंग; अहमदाबाद विमान अपघात, गुजरातचे पोलीस महासंचालक ज्ञानेंद्र सिंह यांचे प्रतिपादन

सर्व प्रक्रियेनंतर हंगामी अहवाल जाहीर करू

नवी दिल्ली: विमान अपघात तपास यंत्रणा ‘एएआयबी’ ने शुक्रवारी सांगितले की, गेल्या वर्षी अहमदाबाद येथे झालेल्या भीषण विमान अपघाताचा अंतिम तपास अहवाल सर्व तपास प्रक्रिया, आवश्यक आंतरराष्ट्रीय पुनरावलोकन आणि सल्लामसलत प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जाहीर केला जाईल. विमान यंत्रणा, फ्लाइट रेकॉर्डर डेटा, इंजिनशी संबंधित घटक, देखभाल, परिचालन रेकॉर्ड आणि इतर पुराव्यांच्या विश्लेषणात महत्त्वपूर्ण प्रगती झाली आहे.

यंत्रणेने मीडिया आणि जनतेसह सर्व संबंधितांना विनंती केली आहे की, तपास सुरू असताना कोणत्याही प्रकारचे तर्कवितर्क किंवा अकाली निष्कर्ष काढणे टाळावे. तपास पूर्ण करण्यासाठी आणि अंतिम अहवाल प्रसिद्ध करण्यासाठी ‘एएआयबी’ने कोणतीही तात्पुरती मुदत जाहीर केली नाही.

logo
marathi.freepressjournal.in